IND W vs BAN W Match No Result Due To Rain Pratika Rawal Injury Big Blow For India Before Semis : नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर रंगलेला भारत-बांगलादेश यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्याची वेळ आली. यंदाच्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पावसाच्या खेळामुळे रद्द झालेला हा सहावा सामना ठरला. पावसाने मारलेल्या या 'षटकारा'सह सेमीफायनलआधी भारतीय संघालाही मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाकडून ओपनिंगचा नवा प्रयोग; पण शेवटी पाऊस जिंकला!
पावसाच्या व्यत्ययामुळे नवी मुंबईच्या मैदानातील भारत-बांगलादेश यांच्यातील सामना प्रत्येकी-२७-२७ षटकांचा करण्यात आला होता. बांगलादेशच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २७ षटकांत ९ विकेट्सच्या मोबदल्यात ११९ धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतीय संघाला २७ षटकांत १२६ धावांचे टार्गेट मिळाले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियात स्मृतीसोबत अमनजोत कौरच्या रुपात ओपनिंगचा नवा प्रयोग पाहायला मिळाला. धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधना हिने २७ चेंडूत नाबाद ३४ धावा आणि अमनजोत कौर २५ चेंडूत नाबाद १५ धावा करत संघाला दमदार सुरुवा करून दिली. पण ८.४ षटकानंतर भारताच्या धावफलकावर ५७ धावा असताना पावसामुळे पुन्हा खेळ थांबवण्यात आला. शेवटी सामना रद्द झाला अन् सामना निकाली न लागल्यामुळे पुन्हा पाऊस जिंकल्याचे पाहायला मिळाले.
सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का, प्रतीका रावलच्या दुखापतीनं वाढवली चिंता
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताची युवा सलामीची बॅटर प्रतीका रावल दुखापतग्रस्त झाली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात १२२ धावांची दमदार खेळी करणाऱ्या प्रतीका ही यंदाच्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत स्मृती मानधनापाठोपाठ सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण बांगलादेशच्या डावातील २१ व्या षटकात सीमारेषेवर एक चेंडू अडवताना तिचा पाय मुरगळला. या दुखापतीनंतर तिच्यावर मैदान सोडण्याची वेळ आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनल आधी प्रतीकाची दुखापतीमुळे टीम इंडियासाठी एक मोठा धक्काच आहे.
दुखापतीसंदर्भात बीसीसीआयनं दिली अशी माहिती
BCCI कडून प्रतीकाच्या दुखापतीबाबत अपडेट देण्यात आलं. बीसीसीआयनं एक्स अकाउंटवरुन एक ट्विट केलं आहे, यात त्यांनी म्हटलंय की, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षणावेळी प्रतीका रावलच्या पायाच्या घोट्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. ती बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या निरीक्षणाखाली आहे. एकाच पायाला दोन दुखापतीमुळे ती यातून सावरून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळणार की, नाही? याबाबत संभ्रम आहे.
Web Summary : Rain washed out India-Bangladesh. India needed 126 in 27 overs. Opener Pratiksha Rawal's injury during the match raises concerns before the semi-final against Australia. BCCI confirmed she is under observation.
Web Summary : बारिश के कारण भारत-बांग्लादेश का मैच रद्द हो गया. भारत को 27 ओवरों में 126 रनों की जरूरत थी. सलामी बल्लेबाज प्रतीक्षा रावल की चोट ने ऑस्ट्रेलिया के खिलाफ सेमीफाइनल से पहले चिंता बढ़ा दी है. बीसीसीआई ने पुष्टि की कि वह निगरानी में हैं.