Join us

Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी

वर्ल्ड कप स्पर्धेआधी स्मृती मानधनाचा जलवा; पहिल्या वनडेतील अर्धशतकानंतर आता शतकासह रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:13 IST

Open in App

Smriti Mandhana Equals World Record With Smashes 12th ODI Century  Against Australia  : भारताची उपकर्णधार आणि महिला वनडेतील क्वीन स्मृती मंधाना हिने बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विक्रमी शतकी खेळी साकारली. न्यू चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम रंगलेल्या सामन्यात स्मृती मानधनाने आपल्या वनडे कारकिर्दीतील १२ शतक झळकावले.  या शतकासह तिने वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

१२ व्या शतकासह स्मृतीनं साधला वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करण्याचा डाव

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारतीय महिला संघाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केले. पहिल्या वनडेत धावबादच्या रुपात अर्धशतकावर अडखळलेल्या स्मृती मानधनाने दुसऱ्या  वनडेत शतकी खेळीसह संघाला दमदार सुरुवात करून दिली. महिला वनडेत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या बॅटरच्या यादीत ती आता १२ शतकांसह संयुक्तरित्या अव्वलस्थानावर पोहचलीये. तिच्याशिवाय  न्यूझीलंडच्या सुझी बेट्स आणि इंग्लंडच्या टॅमी ब्यूमाँट या दोघींनी वनडेत प्रत्येकी १२-१२ शतके झळकवल्याचा रेकॉर्ड आहे. 

टॅग्स :स्मृती मानधनाभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ