Smriti Mandhana Equals World Record With Smashes 12th ODI Century Against Australia : भारताची उपकर्णधार आणि महिला वनडेतील क्वीन स्मृती मंधाना हिने बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विक्रमी शतकी खेळी साकारली. न्यू चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम रंगलेल्या सामन्यात स्मृती मानधनाने आपल्या वनडे कारकिर्दीतील १२ शतक झळकावले. या शतकासह तिने वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१२ व्या शतकासह स्मृतीनं साधला वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करण्याचा डाव
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारतीय महिला संघाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केले. पहिल्या वनडेत धावबादच्या रुपात अर्धशतकावर अडखळलेल्या स्मृती मानधनाने दुसऱ्या वनडेत शतकी खेळीसह संघाला दमदार सुरुवात करून दिली. महिला वनडेत ओपनरच्या रुपात सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या बॅटरच्या यादीत ती आता १२ शतकांसह संयुक्तरित्या अव्वलस्थानावर पोहचलीये. तिच्याशिवाय न्यूझीलंडच्या सुझी बेट्स आणि इंग्लंडच्या टॅमी ब्यूमाँट या दोघींनी वनडेत प्रत्येकी १२-१२ शतके झळकवल्याचा रेकॉर्ड आहे.
सलामी बॅटरच्या रुपात वनडेत सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड
खेळाडू | कालावधी | डाव | धावा | सर्वोच्च धावसंख्या | सरासरी | शतकं | अर्धशतकं |
---|
सुझी बेट्स (न्यूझीलंड) | २००६–२०२५ | १३० | ५०५९ | १५१ | ४३.२३ | १२ | ३३ |
स्मृती मंधाना (भारत) | २०१३–२०२५ | १०६ | ४७२४* | १३६ | ४७.४२ | १२ | ३३ |
टॅमी ब्यूमाँट (इंग्लंड) | २०१२–२०२५ | ११३ | ४४६० | १६८* | ४२.४७ | १२ | २३ |
शार्लट एडवर्ड्स (इंग्लंड) | १९९७–२०१५ | ११७ | ४०४८ | १७३* | ३७.८३ | ९ | ३० |
हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज) | २०१४–२०२५ | ८२ | २६७८ | १४१ | ३४.७७ | ९ | ६ |
Web Title: India Women vs Australia Women, 2nd ODI Smriti Mandhana Equals World Record With Smashes 12th ODI Century As Opener For IND-W vs AUS-W
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.