Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup Warm-Up Match : टीम इंडियाचं फलंदाजीतील शक्तीप्रदर्शन! ईशान-तिलकसह हार्दिकनं द. आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं

ईशान किशनचा धमाका, अभिषेकसह रिटायर्ड आउट होऊन परतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 21:22 IST

Open in App

India vs South Africa T20 World Cup Warm-Up Match : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करण्याआधी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामन्यात टीम इंडियाने आपल्या फलंदाजीच शक्ती प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. सूर्यकुमार यादवनं या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर अभिषेक शर्माच्या साथीनं ईशान किशनने भारताच्या डावाची सुरुवात केली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ईशान किशनचा धमाका, अभिषेकसह रिटायर्ड आउट होऊन परतला

ईशान किशन आणि अभिषेक शर्मा या जोडीनं पॉवर प्लेमध्ये धमाकेदार खेळीसह हा नवा प्रयोग यंदाच्या हंगामात टीम इंडियासाठी फायदाचा ठरेल, असे संकेत दिले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३४ चेंडूत ८० धावांची धमाकेदार भागीदारी केली. ईशान किशन २० चेंडूत ७ षटकार आणि २ चौकाराच्या मदतीने २६५ च्या स्ट्राईक रेटसह ५३ धावा केल्या. अभिषेक शर्मानं ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १८ चेंडूत २४ धावा केल्या. दोघेही रिटायर्ड आउट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. 

U 19 World Cup 2026 : वैभव सूर्यवंशीचे वादळी अर्धशतक! ३०० पारच्या लढाईत षटकार-चौकारांची 'बरसात' अन्....

गेम प्लॅननुसार तिलक वर्मानं दाखवला परफेक्ट शो

 दुखापतीतून सावरून टीम इंडियात परतलेल्या तिलक वर्मानंही दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. वर्ल्ड कपच्या मोहिमे आधीच कर्णधार सूर्यकुमार यादवनं तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार हे स्पष्ट केले होते. सराव सामन्यात टीम इंडियाचा हा गेम प्लॅन पाहायला मिळाला. मार्को यान्सेनच्या गोलंदाजीवर विकेट गमावण्याआधी त्याने १९ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ४५ धावांची धमाकेदार खेळी करून ही स्पर्धा गाजवण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले.  त्याने जवळपास २३६ च्या स्ट्राईक रेटनं धावा काढल्या. 

हार्दिक पांड्याचा कहर, टीम इंडियानं १२० चेंडूत कुटल्या २४० धावा

सूर्यकुमार १६ चेंडूत ३० धावा करून बाद झाला. रिंकूने १३ चेंडूत १६ धावांची भर घातली. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याचा स्फोटक अंदाज पाहायला मिळाला. त्याने १० चेंडूत ३०० च्या स्ट्राइक रेटनं ३० धावा काढल्या. टीम इंडिया बापू अर्थात अक्षर पटेलनं २३ चेंडूत नाबाद ३५ धावांची खेळी करत निर्धारित २० षटकात भारतीय संघाच्या धावफलकावर ६ विकेट्सच्या मोबदल्यात २४० धावा लावल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : India's Batting Display: Ishan, Tilak, and Hardik Thrash South Africa!

Web Summary : In a T20 World Cup warm-up, India showcased batting prowess. Ishan Kishan, Tilak Varma, and Hardik Pandya dominated South Africa's bowlers, setting a strong tone for the tournament with a final score of 240.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाइशान किशनतिलक वर्माहार्दिक पांड्यासूर्यकुमार यादव