India vs South Africa 2nd ODI Live Streaming: कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत अगदी धमाक्यात सुरुवात केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय संघाचा कार्यवाही कर्णधार लोकेश राहुलला टॉस वेळा पदरी निराशा आली. टेम्बा बावुमाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने सलग २० वनडे सामन्यात टॉस गमावला आहे.
रायपूरच्या मैदानात आतापर्यंत फक्त एकमेव एकदिवसीय सामना खेळवण्यात आला आहे. या सामन्यात रोहित शर्मानं भारताकडून सर्वोच्च ५१ धावांची खेळी केली होती. चाहते पुन्हा एकदा हिटमॅनच्या हिट शोसाठी आतूर असतील. रोहितशिवाय या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीवर नजरा असतील. त्याने रांची वनडेत शतकी खेळी साकारली होती. इथं एक नजर टाकुयात IND vs SA आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यातील Live Streaming संदर्भातील सविस्तर...
IND vs SA 2nd ODI सामना कुठं पाहता येईल?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना JioHotstar अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून पाहता येईल. याशिवाय टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर या सामन्याचा क्रिकेट चाहते आनंद घेऊ शकतील.
Web Summary : After a Test series defeat, India faces South Africa in the second ODI. South Africa won the toss and chose to bowl. The match can be viewed on JioHotstar and Star Sports.
Web Summary : टेस्ट श्रृंखला में हार के बाद, भारत का दक्षिण अफ्रीका से दूसरा वनडे। दक्षिण अफ्रीका ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया। यह मैच JioHotstar और Star Sports पर देखा जा सकता है।