India vs South Africa Live Cricket Streaming : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी२० सामना हिमाचल प्रदेशमधील धर्मशालाच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन लढतीनंतर दोन्ही संघ मालिकेत १-१ बरोबरीत आहेत. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उप कर्णधार शुभमन गिल यांचा फॉर्म चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. इथं एक नजर टाकुयात भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना कुठं आणि कसा पाहता येईल? यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कधी अन् कुठे रंगणार?
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी२० सामना १४ डिसेंबर २०२५ रोजी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल. दोन्ही कर्णधार साडेसहा वाजता नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
IND vs SA 3rd T20I Live Cricket Streaming कुठे उपलब्ध असेल?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी२० सामन्याचे थेट प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर उपलब्ध असेल. याशिवाय जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून चाहते या सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
टीम इंडिया शुभमन गिलसंदर्भात मोठा निर्णय घेणार?
भारतीय संघाचा उप कर्णधार शुभमन गिल टी-२० मध्ये धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसनच्या जागी संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर भरवसा दाखवला आहे. पण सातत्याने तो अपयशी ठरताना दिसून आले. पहिल्या दोन सामन्यातील फ्लॉप शोनंतर टीम इंडिया त्याच्याबद्दल काय निर्णय घेणार? संजूला आतातरी संधी मिळणार का? तेही पाहण्याजोगे असेल.
भारतीय टी-२० संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक/फलंदाज) अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिळक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, संजू सॅमसन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर,
हर्षित राणा.
दक्षिण आफ्रिकेचा टी-२० संघ
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक/फलंदाज), एडन मार्करम(कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, डेवाल्ड ब्रेविस, डेविड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे,मार्को जॅन्सन, लुथो सिपमला, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, टोनी डी झोर्झी, क्वेना मफाका,
नॉर्टजे समृद्ध करा, ट्रिस्टन स्टब्स.