IND vs SA T20I Sanju Samson Replaces Shubman Gill In Indias XI अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघ तीन बदलासह मैदानात उतरला आहे. एडन मार्करम याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर सूर्यकुमार यादवनं मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया तीन बदलासह मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शुभमन गिलच्या जागी संजूची टीम इंडियात एन्ट्री
वर्ल्ड कप संघ निवडीच्या आधी टी-२० संघाचा उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून आउट झाला आहे. दुसरीकडे संजू सॅमसनला पुन्हा भारतीय संघात संधी मिळाली आहे. एवढेच नाहीतर पुन्हा एकदा त्याला डावाची सुरुवात करण्याची संधीही मिळाली. याशिवाय जसप्रीत बुमराह देखील संघात परतला असून वॉशिंग्टन सुंदरलाही टीम इंडियात संधी देण्यात आली आहे.
Team India T20 World Cup Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? तारीख अन् वेळ ठरली!
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन:
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
गिल आला अन् चांगली कामगिरी करूनही संजूवर आली बाकावर बसण्याची वेळ, पण...
आशिया कप टी-२० स्पर्धेत शुभमन गिल टी-२० संघात परतला. २ वर्षांनी पुन्हा टीम इंडियाच्या टी-२० संघात परतल्यावर त्याच्याकडे उप कर्णधार पदासह सलामीची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे सातत्याने सलामीली जबरदस्त कामगिरी करूनही संजू सॅमसनने आधी बॅटिंग ऑर्डरमध्ये खाली ढकलण्यात आले. त्यानंतर तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर गेला. पण शुभमन गिल सातत्याने अपयशी ठरताना दिसले. भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी संजू हाच सर्वोत्तम पर्याय आहे अशी चर्चा रंगू लागली. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवड होण्याआधी संजूला पुन्हा सलामीला संधी मिळाली. शुभमन गिल खरंच दुखापतग्रस्त आहे का? हा एक वेगळा मुद्दा. पण त्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचे सलामीचे टेन्शन नक्कीच कमी झाले आहे. टी-२० वर्ल्ड कप निवडीदरम्यान शुभमन गिल टी-२० संघात कायम राहणार का? तसे झाले तर प्लेइंग इलेव्हनचं समीकर काय असेल? ते पाहण्याजोगे असेल.