Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द

भारत मालिका गमावणार नाही अन् दक्षिण आफ्रिका जिंकू शकणार नाही, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 21:57 IST

Open in App

IND vs SA 4th T20I Match Abandoned Due To Excessive Fog : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लखनौच्या मैदानातील सामना धुक्याच्या प्रभावामुळे रद्द करण्याची वेळ आली. क्रिकेटच्या सामन्यात इतिहासात आतापर्यंत पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द झाल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. पण धुक्यामुळे आंतरराष्ट्रीय सामना एकही चेंडू न खेळवता रद्द करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. हा सामना रद्द झाल्यामुळे चाहत्यांची घोर निराशा झालीच. पण शुभमन गिलच्या अनुपस्थितीत संजूसाठी प्लेइंग इलेव्हनची जी संधी निर्माण झाली होती तीही गेली. आता या मालिकेचा निकाल जगातील सर्वात मोठ्या अहमदाबात येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लागणार आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

भारत मालिका गमावणार नाही अन् दक्षिण आफ्रिका जिंकू शकणार नाही, कारण...

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या ३ सामन्यातील २ विजयासह मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.   लखनौचं मैदान मारत भारतीय संघाला मालिका विजयाची संधी होती. पण हा सामना रद्द झाला आहे. चौथा सामना रद्द झाल्यामुळे भारतीय संघ ही मालिका गमावणार नाही आणि दक्षिण आफ्रिका मालिका जिंकणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. भारतीय संघाने पाचवा आणि अखेरचा सामना गमावला तर मालिका २-२ बरोबरीत सुटेल. याचा अर्थ दक्षिण आफ्रिकेचा संघाने शेवटचा सामना जिंकला तरी त्यांना मालिका आपल्या नावे करता येणार नाही.  याउलट भारतीय संघाकडे अजूनही शेवटचा सामान जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : IND vs SA T20I: Fog cancels match, series win hangs in balance.

Web Summary : The India-South Africa T20I match in Lucknow was abandoned due to heavy fog, a first in international cricket. India leads the series 2-1; a draw secures a series tie, while a win in Ahmedabad secures victory.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशुभमन गिलसंजू सॅमसनसूर्यकुमार यादव