IND vs SA 4th T20I Match Abandoned Due To Excessive Fog : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लखनौच्या मैदानातील सामना धुक्याच्या प्रभावामुळे रद्द करण्याची वेळ आली. क्रिकेटच्या सामन्यात इतिहासात आतापर्यंत पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द झाल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. पण धुक्यामुळे आंतरराष्ट्रीय सामना एकही चेंडू न खेळवता रद्द करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. हा सामना रद्द झाल्यामुळे चाहत्यांची घोर निराशा झालीच. पण शुभमन गिलच्या अनुपस्थितीत संजूसाठी प्लेइंग इलेव्हनची जी संधी निर्माण झाली होती तीही गेली. आता या मालिकेचा निकाल जगातील सर्वात मोठ्या अहमदाबात येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लागणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत मालिका गमावणार नाही अन् दक्षिण आफ्रिका जिंकू शकणार नाही, कारण...
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या ३ सामन्यातील २ विजयासह मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. लखनौचं मैदान मारत भारतीय संघाला मालिका विजयाची संधी होती. पण हा सामना रद्द झाला आहे. चौथा सामना रद्द झाल्यामुळे भारतीय संघ ही मालिका गमावणार नाही आणि दक्षिण आफ्रिका मालिका जिंकणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. भारतीय संघाने पाचवा आणि अखेरचा सामना गमावला तर मालिका २-२ बरोबरीत सुटेल. याचा अर्थ दक्षिण आफ्रिकेचा संघाने शेवटचा सामना जिंकला तरी त्यांना मालिका आपल्या नावे करता येणार नाही. याउलट भारतीय संघाकडे अजूनही शेवटचा सामान जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे.
आधी गंभीरसोबत ओपनिंग; आता IPL लिलावात 'त्या' खासदाराच्या लेकावर शाहरुखच्या KKR नं लावला पैसा!
सातत्याने चाचपणी झाली, पण शेवटी सामना रद्द करण्याची आली वेळ!
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना सायंकाळी ७ वाजता नियोजित होता. त्याआधी ६ वाजून ३० मिनिटांनी नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार मैदानात येतील, अशी अपेक्षा होती. पण धुक्यामुळे नाणेफेक वेळेत झाली नाही. पंचांनी ६ वाजून ५० मिनिटांनी मैदानात येऊन निरीक्षण केले. त्यानंतर ७ वाजून ३० मिनिटांनी पुन्हा निरीक्षण करण्यात आले. नऊ वाजेपर्यंत पंचांकडून अर्ध्या तासाला हा खेळ पाहायला मिळाला. शेवटी पंचांनी सामना रद्द झाल्याची घोषणा केली.