India vs South Africa 4th T20I Live Streaming : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना लखनौच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया कमालीची कामगिरी करत असली तरी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उप कर्णधार शुभमन गिल दोघेही धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. ही जोडी दमदार कमबॅक करण्यात यशस्वी ठरणार का? सामन्यासह लखनौच्या मैदानातच भारतीय संघ मालिका खिशात घालणार का? या दृष्टीने चौथा टी-२० सामना महत्त्वाचा असेल. इथं एक नजर टाकुयात कधी कुठं आणि कसा पाहता येईल भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना कुठं रंगणार?
बुधावारी, १७ डिसेंबरला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. अर्धातास अगोदार दोन्ही संघातील कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
IND vs SA सामन्याचे थेट प्रक्षेपण व स्ट्रीमिंग
- टेलिव्हिजनवर: स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर
- लाइव्ह स्ट्रीमिंग: जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइट
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक.), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एडन मार्करम (कर्णधार), डेवॉल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, डोनोव्हन फरेरा, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, ॲनरिक नॉर्तजे, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील हेड-टू-हेड आकडेवारी
- एकूण सामने : ३४
- भारत : २० विजय
- दक्षिण आफ्रिका : १३ विजय
- अनर्णित सामने - १
टी-२० मालिकेत भारतीय संघाकडे आघाडी, पण...
९ डिसेंबरला कटक येथील बाराबती स्टेडयमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने १०१ धावांनी विजयी सलामी दिली होती. मुल्लानपूर येथील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत कमबॅक करत १-१ अशा बरीबरीचा डाव साधला. त्यानंतर धर्मशाला येथील मैदानातील विजयासह भारतीय संघाने पुन्हा मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारत दौऱ्यावर कमबॅक करून इतिहास रचला आहे. त्यामुळेच लखौच्या मैदानात त्यांनी ती संधी देता कामा नये. नाहीतर टीम इंडियाचे मालिका विजयाचे गणित बिघडू शकते.