Join us
Daily Top 2Weekly Top 5

India vs South Africa, 3rd Test: रांची कसोटीपूर्वी टीम इंडियाचा फिरकीपटू जायबंदी

भारतीय संघात कमबॅक करताना फिरकीपटू आर अश्विनने दोन्ही कसोटी गाजवल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 19:54 IST

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा फिरकीपटूचा खांदा दुखू लागला आणि त्यानं माघार घेतली. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून भारत आफ्रिकेला क्लिन स्वीप देण्यासाठी उत्सुक आहे. 

भारतीय संघात कमबॅक करताना फिरकीपटू आर अश्विनने दोन्ही कसोटी गाजवल्या. त्याला रवींद्र जडेजाने तोडीसतोड साथ दिली. मालिका खिशात घातल्यामुळे  तिसऱ्या कसोटीत कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता होती. सकाळच्या सत्रात त्यानं संघासोबत सरावही केला. 

पण त्याचा खांदा दुखू लागला आणि त्याला माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी संघात शाहबाद नदीमला बदली खेळाडू म्हणून समाविष्ट केले गेले आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका