Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA 1st T20I : KL राहुलची कॉपी करुनही सूर्या ठरला अनलकी! संजूसह गंभीरचा 'लाडला' बाकावर

India vs South Africa 1st T20I : कटकच्या मैदानातील पहिल्या टी-२० सामन्यात नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा भारताच्या विरोधात लागला. वनडेत ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 19:03 IST

Open in App

India vs South Africa 1st T20I : कटकच्या मैदानातील पहिल्या टी-२० सामन्यात नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा भारताच्या विरोधात लागला. वनडेत KL राहुलनं टॉस उंचावताना डाव्या हाताचा फंडा आजमावला होता. सूर्यानंही त्याची कॉपी केली. पण त्याचे नशीब काही बदलले नाही.  सूर्यकुमार यादवसमोर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमन नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीतून सावरुन संघात परतलेल्या शुभमन गिलसह हार्दिक पांड्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली आहे. अभिषेक शर्मासोबत उप कर्णधार शुभमन गिलच भारताच्या डावाची सुरुवात करेल. 

संजूसह कुलदीपसह हर्षित राणाही बाकावर

टॉस गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आल्यावर सूर्यकुमार यादवनं कोणत्या रणनितीसह मैदानात उतरणार हे सांगताना प्लेइंग इलेव्हनम सांगण्याऐवजी बाहेर बसवण्यात आलेल्या मंडळींची नावे घेतली. संजू सॅमसन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा यांच्याशिवाय संघ मैदानात उतरणार असल्याचे तो म्हणाला

भारताची प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका  प्लेइंग इलेव्हन 

क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), एडन मार्कराम (क), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Unlucky Surya copies KL Rahul; Sanju and ladla benched in 1st T20I

Web Summary : India lost the toss despite Surya copying Rahul's luck ritual. Gill and Abhishek opened. Sanju Samson and others were benched. India is batting first. Key players for both India and South Africa are in the lineup.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार यादव