Join us

India Vs Pakistan Latest News: भारत-पाकिस्तानच्या सामन्यात झळकले बाळासाहेब आणि मोदींचे बॅनर

क्रिकेटप्रेमींनी सामन्यादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे असलेले बॅनर झळकवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 06:56 IST

Open in App

मुंब्रा : इंग्लंड येथे सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान रविवारी भारत पाकिस्तानदरम्यान सामना रंगला. हा सामना पाहण्यासाठी मँचेस्टरमध्ये जगभरातून क्रिकेटप्रेमी दाखल झाले होते. हा अटीतटीचा सामना बघण्यासाठी गेलेल्या ठाणे जिल्ह्यातील दिवा येथील संदेश भगत, राहूल पाटील आणि निलेश भोईर हेदेखील गेले होते. या क्रिकेटप्रेमींनी सामन्यादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे असलेले बॅनर झळकवले.या बॅनरवर हिंदूस्थानके दो शेर असे लिहिले होते. सामना बघताना त्यांनी परिधान केलेल्या आगरी टोप्या, तसेच एकंदरीत पेहेराव आकर्षक होता. सामना बघण्यासाठी आलेल्या इतर क्रि केट शौकिनांचे लक्ष या बॅनरने वेधून घेतले.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध पाकिस्ताननरेंद्र मोदीबाळासाहेब ठाकरे