Join us

India vs Pakistan Live Scorecard : गिलचाही 'दांडा' गुल! पाकिस्तानी गोलंदाजांसमोर टीम इंडियाची वाताहत; ४ गडी तंबूत

नेहमीप्रमाणे पाकिस्तानी गोलंदाजांनी आपली अप्रतिम कामगिरी करत भारतीय संघाला कोंडीत पकडले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 17:21 IST

Open in App

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : नेहमीप्रमाणे पाकिस्तानी गोलंदाजांनी आपली अप्रतिम कामगिरी करत भारतीय संघाला कोंडीत पकडले. पहिल्यांदा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा त्रिफळा उडवून शाहीन आफ्रिदीने टीम इंडियाला मोठे धक्के दिले. त्यानंतर हारिस रौफने श्रेयस अय्यरची शिकार केली. पण, सलामीवीर शुबमन गिल मात्र सावध खेळी करून खेळपट्टीवर टिकून होता. पण, गिलचा देखील त्रिफळा उडवून हारिस रौफने भारतीय चाहत्यांना शांत केले.

गिल पंधराव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बाद झाला. हारिस रौफच्या वेगवान चेंडूने त्याचा त्रिफळा काढला. सोळा षटकापर्यंत भारतीय संघाच्या ४ बाद ८३ धावा असून हार्दिक पांड्या (७) आणि इशान किशन (२३) धावांवर खेळत आहे. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ यांनी प्रत्येकी २-२ बळी घेऊन भारताची फलंदाजी मोडीत काढली. 

सुरूवातीपासूनच सावध खेळत असलेल्या टीम इंडियाला सुरूवातीपासूनच पाकिस्तानी गोलंदाजांनी सतावले. कर्णधार रोहित शर्मा (११) धावा करून बाद झाला. तर, विराट कोहली (४), श्रेयस अय्यर (१४) आणि शुबमन गिल (१०) धावा करून तंबूत परतला. 

 आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर झमान, इमाम-उल-हक, सलमान अली अघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ.  

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानएशिया कप 2023पाकिस्तानशुभमन गिलभारतीय क्रिकेट संघ
Open in App