India vs Oman Live Streaming : टीम इंडियासमोर निभाव लागणं 'मुश्किल'; तरीही ओमान इतिहास रचणार!

इथं जाणून घेऊयात भारत विरुद्ध ओमान यांच्यातील सामना कधी अन् कुठं रंगणार? या सामन्यांचा आनंद कसा घेता येईल? यासंदर्भातील सविस्तर माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 10:21 IST2025-09-19T10:19:03+5:302025-09-19T10:21:54+5:30

whatsapp join usJoin us
India vs Oman Free Live Streaming Telecast in India When and Where to Watch Asia Cup 2025 Match 12 Know IND vs Oman Head to Head Record | India vs Oman Live Streaming : टीम इंडियासमोर निभाव लागणं 'मुश्किल'; तरीही ओमान इतिहास रचणार!

India vs Oman Live Streaming : टीम इंडियासमोर निभाव लागणं 'मुश्किल'; तरीही ओमान इतिहास रचणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Oman Free Live Streaming Telecast in India When and Where to Watch Asia Cup 2025 Match 12 : आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरचा सामना भारत विरुद्ध ओमान यांच्यात रंगणार आहे. यंदाच्या हंगामात जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या टीम इंडियाविरुद्धची लढत  ओमानसाठी आव्हानात्मक असेल, यात शंका नाही. या सामन्यात ओमानचा निभाव लागणं 'मुश्किल'च आहे. पण त्यातही हा नवखा संघ टीम इंडियाविरुद्ध इतिहास रचेल. कारण पहिल्यांदाच ते टीम इंडियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहेत. त्यामुळेच हा क्षण ओमान संघासाठी खास ठरेल. इथं जाणून घेऊयात भारत विरुद्ध ओमान यांच्यातील सामना कधी अन् कुठं रंगणार? या सामन्यांचा आनंद कसा घेता येईल? यासंदर्भातील सविस्तर माहिती 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

भारतात टेलिव्हिजनवरील थेट प्रसारणाचे हक्क कुणाकडे? (TV Rights In India)

आशिया कप २०२५ स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रसारण हक्क हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. IND vs Oman यांच्यातील साखळी फेरीतील अखेरचा सामना सोनी स्पोर्ट्स टेन १ (Sony Sports Ten 1), सोनी स्पोर्ट्स टेन ३ (Sony Sports Ten 3 हिंदी), सोनी स्पोर्ट्स टेन ४ (Sony Sports Ten 4 तामिळ), सोनी स्पोर्ट्स टेन ५ (Sony Sports Ten 5)  या चॅनेलवर प्रसारित करण्यात येईल.

Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या ...

IND vs Oman लाईव्ह स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म (Live Streaming Platform in India)

Sony Liv अ‍ॅप आणि वेबसाईट वर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. त्यासाठी प्रेक्षकांना सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यावा लागेल. क्रिकेट चाहते Airtel, Vi किंवा Jio SIM द्वारेही Sony Liv वर लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेऊ शकतात. 

सामना कधी अन् कुठ रंगणार? (When And Where Will The Match Be Played?)

भारत विरुद्ध ओमान यांच्यातील सामना १९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता सुरु होईल. या स्पर्धेतील भारतीय संघाचे पहिले दोन सामने हे दुबईच्या मैदानात खेळवण्यात आले होते. हा सामना अबू धाबी येथील  शेख झायेद स्टेडियमवर नियोजित आहे.

भार विरुद्ध ओमान हेड टू हेड रेकॉर्ड (IND vs Oman Head to Head Record)

भारत आणि ओमान यांच्यात आतापर्यंत एकही टी-२० सामना झालेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच हे दोन संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. गत वर्षी इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत भारत-ओमान यांच्यात टी-२० सामना झाला होता. त्यावेळी भारतीय संघाचे  नेृत्वव करणारा तिलक वर्मासह सलामीवीर अभिषेक शर्मा सध्याच्या टीमचा भाग आहेत.


 

Web Title: India vs Oman Free Live Streaming Telecast in India When and Where to Watch Asia Cup 2025 Match 12 Know IND vs Oman Head to Head Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.