IND vs NZ 3rd T20I Live Streaming : न्यूझीलंडसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान; टीम इंडियाला हॅटट्रिकची संधी

भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात या दोन खेळाडूंच्या कामगिरीवर असतील नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 12:20 IST2026-01-25T12:04:02+5:302026-01-25T12:20:37+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs New Zealand Live Streaming Info 3rd T20I Where To Watch The IND vs NZ Match Today Eyes On Jasprit Bumrah Sanju Samson | IND vs NZ 3rd T20I Live Streaming : न्यूझीलंडसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान; टीम इंडियाला हॅटट्रिकची संधी

IND vs NZ 3rd T20I Live Streaming : न्यूझीलंडसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान; टीम इंडियाला हॅटट्रिकची संधी

IND vs NZ 3rd T20I Live Streaming Info : न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय नोंदवला. या विजयासह भारतीय संघाने घरच्या मैदानात रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी शड्डूच ठोकला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म परतला असून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अचानक टीम इंडियात स्थान मिळालेल्या इशान किशन यानेही आपल्यातील धमक दाखली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

वर्ल्ड कपआधी या दोन खेळाडूंच्या कामगिरीवर असतील नजरा

 सलामीवीराच्या रुपात पहिली पंसती असलेला संजू सॅमसनसह भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचा खास अंदाज अजून दिसलेला नाही. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या हॅटट्रिकसह  या दोघांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडचा संघासमोर मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी ही 'करो वा मरो'ची लढाई असेल. इथं जाणून घेऊयात कधी अन् कुठं रंगणार दोन्ही संघातील तिसरा टी-२० सामना?  हा सामना कसा पाहायचा यासंदर्भातील सविस्तर माहिती....

सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना सूर्या-इशान जोडीच ठरलीये सगळ्यात भारी, इथं पाहा रेकॉर्ड

कधी अन् कुठं रंगणार IND vs NZ यांच्यातील तिसरा टी-२० सामना?

भारत-न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी०२० मालिकेतील तिसरा सामना गुवाहटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. २५ जानेवारी २०२६ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी ७ वाजता या सामन्याची सुरुवात होईल. दोन्ही संघाचे कर्णधार अर्धातास आधी नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. 

IND vs NZ यांच्यातील सामना Live Streaming संदर्भातील माहिती 

भारत-न्यूझीलंड यांच्यातील द्विपक्षीय मालिकेतील सामन्याच्या प्रसारणाचे हक्क स्टार नेटवर्ककडे आहेत. टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्स १, २ आणि ३ या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषेतील समालोचनासह क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता येईल. याशिवाय JioHotstar वर लाईव्ह स्ट्रीमिंगही हा सामना उपलब्ध असेल. 

भारतीय संघ (India Squads)

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, ईशान किशन (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई

 न्यूझीलंडचा संघ (New Zealand Squads)

मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉन्वे (यष्टीरक्षक), जेकब डफी, झॅक फॉल्क्स, मॅट हेन्री, काइल जेमिसन, बेव्हन जेकब्स, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन, इश सोढी, क्रिस्टियन क्लर्क.
 

Web Title : भारत बनाम न्यूजीलैंड तीसरा टी20: भारत की श्रृंखला जीतने पर नजर।

Web Summary : भारत तीसरे टी20 में न्यूजीलैंड के खिलाफ श्रृंखला जीतने का लक्ष्य बना रहा है। सबकी निगाहें सैमसन और बुमराह के फॉर्म पर हैं। न्यूजीलैंड के लिए यह करो या मरो की स्थिति है। मैच का प्रसारण स्टार स्पोर्ट्स और जियो हॉटस्टार पर किया जाएगा।

Web Title : India vs New Zealand 3rd T20I: India aims for series win.

Web Summary : India seeks a series-clinching win against New Zealand in the 3rd T20I. All eyes are on Samson and Bumrah's form. New Zealand faces a must-win situation. The match will be broadcast on Star Sports and JioHotstar.