भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-२० सामना नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात नाणेफेकीच्या वेळी सूर्यकुमार यादवच्या पदरी निराशा आली. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बऱ्याचदा सूर्यकुमार यादव नाणेफेकीचा कौल गमावल्यावर जे मिळालं तेच मनात होतं असं सांगताना दिसला आहे. पण यावेळी त्याने नाणेफेकीच्या वेळी जी गोष्ट घडली ती मनाजोगी नव्हती असे स्पष्ट सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अय्यरसह हर्षित राणा अन् कुलदीप यादवही बाकावर
नाणेफेर गमावल्यावर भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, या मैदानात सराव करताना आम्हाला रात्री साडे आठच्या सुमारास दव पडल्याचे जाणवले. त्यामुळेच नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करायची होती. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण हे सांगण्याऐवजी सूर्यानं कुणाला संधी मिळाली नाही, त्यांची नावे सांगितली. श्रेयस अय्यर, हर्षित राणा आणि रवी बिश्नोईसह कुलदीप यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही, असे सूर्या म्हणाला.
IND vs NZ : सूर्याला हे अजिबात मान्य नाही! न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेआधी मोठं वक्तव्य, म्हणाला...
न्यूझीलंडकडून क्लर्कला पदार्पणाची संधी
नाणेफेकीनंतर मिचेल सँटनर म्हणाला की, भारतीय मैदानात विजय मिळवणं खूपच कठीण आहे. याआधी आम्ही चांगली कामगिरी केली आहे. त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. क्लर्क पदार्पणासाठी सज्ज असून जेमीसन आणि डफी देखील संघात खेळत आहेत.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
संजू सॅमसन (यष्टीरक्षक फलंदाज), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन
टिम रॉबिन्सन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (कर्णधार), क्रिस्टियन क्लर्क, काइल जेमिसन, ईश सोधी, जेकब डफी.