Join us

India vs England : शार्दुल ठाकूरला भारतीय संघात संधी

भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा इंग्लंडच्या दौऱ्यात जायबंदी झाला आहे. त्याच्या जागी भारतीय संघात शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 16:54 IST

Open in App
ठळक मुद्देइंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये शार्दुलचा भारतीय संघाच समावेश करण्यात येणार आहे.

मुंबई : भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा इंग्लंडच्या दौऱ्यात जायबंदी झाला आहे. त्याच्या जागी भारतीय संघात शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये शार्दुलचा भारतीय संघाच समावेश करण्यात येणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेपूर्वीच बुमराला दुखापत झाली होती. त्यामुळे ट्वेन्टी-20 लढतीपूर्वी संघात बदल करण्यात आला होता आणि बुमराऐवजी दीपक चहारला संधी देण्यात आली होती. पण आता बुमरा एकदिवसीय सामन्यांतही खेळणार नसल्यामुळे आता त्याच्या जागी शार्दुलला संधी देण्यात आली आहे.

" बुमराऐवजी शार्दुल ठाकूरला इंग्लंडविरुद्धच्या भारतीय एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. भारताच्या राष्ट्रीय निवड समितीने हा निर्णय घेतला आहे, " असे बीसीसीआयने आपल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.

टॅग्स :इंग्लंड विरुद्ध भारतजसप्रित बुमराहशार्दुल ठाकूरक्रिकेटटी-20 क्रिकेटक्रीडाबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ