India vs England ODIs full schedule : भारतीय संघानं कसोटी मालिकेत ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारली आणि मालिका ३-१ नं जिंकली. पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतही टीम इंडिया ०-१ आणि नंतर १-२ अशी पिछाडीवर पडली होती. त्यातही दमदार कमबॅक करताना मालिका ३-२ अशी जिंकली आणि इंग्लंडला पराभवाचा जबरदस्त धक्का दिला. त्यानंतर आता टीम इंडिया वन डे मालिकेतही पाहुण्यांना पाणी पाजण्यासाठी सज्ज झाली आहे. २३ मार्चपासून भारत-इंग्लंड ( India vs England ODI Series) वन डे मालिका सुरू होणार आहे. लोकेश राहुलचे अपयश हे टीम इंडियासाठी फायद्याचे ठरले; रोहित शर्मा-विराट कोहली जोडीबाबत सुनील गावस्कर स्पष्टच बोलले
India ODI squad for England series भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी BCCI नं केली. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav), कृणाल पांड्या ( Krunal Pandya) व प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh Krishna) यांचा समावेश करण्यात आला आहे. सूर्यकुमारनं इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्या सामन्यात त्याला एकही चेंडू खेळता आला नव्हता, परंतु चौथ्या व पाचव्या सामन्यात त्यानं वादळी खेळी केली. आता वन डे मालिकेत त्याची कामगिरी कशी होते, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. विजय हजारे ट्रॉफीत कृणालनं दमदार कामगिरी केली आणि त्याला वन डे संघात पदार्पणाची संधी मिळाली आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्काराची रक्कम केली दान!
प्रसिद्ध कृष्णा याच्या नावावर ५० लिस्ट ए सामनेही नाहीत, परंतु नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत त्यानं सर्वांचे लक्ष वेधले. त्यानं ४८ लिस्ट ए क्रिकेटम्ये ५.१७च्या इकॉनॉमीनं ८१ विकेट्स घेतल्या आहेत आणि ९ प्रथम श्रेणी सामन्यांत ३४ विकेट्स व ४० ट्वेंटी-20त ३३ विकेट्स घेतल्या आहेत. विजय हजारे ट्रॉफीत त्यानं १४ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता वन डे मालिकेतही टीम इंडियात प्रयोग दिसले तर आश्चर्य वाटायला नको.. Rohit Sharma : वर्ल्ड कप ट्वेंटी-20त विराट कोहलीसोबत सलामीला खेळण्याबाबत रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला...
भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, लोकेश राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दूल ठाकूर. Record Break : ३२ धावांत संपूर्ण संघ तंबूत, ३४ वर्षीय जॅक्सन बर्डनं घेतल्या १८ धावांत ७ विकेट्स; मोडला १५३ वर्षांपूर्वीचा विक्रम
सामने कधी व कोठे?
- पहिला सामना - २३ मार्च, दुपारी १.३० वाजल्यापासून
- दुसरा सामना - २६ मार्च, दुपारी १.३० वाजल्यापासून
- तिसरा सामना - २८ मार्च, दुपारी १.३० वाजल्यापासून
- थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स व हॉटस्टार
- स्थळ - सर्व सामने पुण्यात होतील