Record Break : ३२ धावांत संपूर्ण संघ तंबूत, ३४ वर्षीय जॅक्सन बर्डनं घेतल्या १८ धावांत ७ विकेट्स; मोडला १५३ वर्षांपूर्वीचा विक्रम

भारतीय संघानं पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात इंग्लंडला पराभवाची चव चाखवली. २०-२० षटकांच्या या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ४००+ धावा चोपल्या. ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 10:04 AM2021-03-21T10:04:00+5:302021-03-21T10:07:38+5:30

whatsapp join usJoin us
New South Wales bundled out for just 32 runs against Tasmania in Sheffield Shield with Jackson Bird taking 7 for 18 | Record Break : ३२ धावांत संपूर्ण संघ तंबूत, ३४ वर्षीय जॅक्सन बर्डनं घेतल्या १८ धावांत ७ विकेट्स; मोडला १५३ वर्षांपूर्वीचा विक्रम

Record Break : ३२ धावांत संपूर्ण संघ तंबूत, ३४ वर्षीय जॅक्सन बर्डनं घेतल्या १८ धावांत ७ विकेट्स; मोडला १५३ वर्षांपूर्वीचा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघानं पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात इंग्लंडला पराभवाची चव चाखवली. २०-२० षटकांच्या या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ४००+ धावा चोपल्या. तेच दुसरीकडे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आणि १५३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला गेला. ऑस्ट्रेलियाचा ३४ वर्षीय गोलंदाज जॅक्सन बर्ड ( Jacson Bird) याच्यासमोर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. न्यू साऊथ वेल्स आणि तस्मानिया ( New South Wales Vs  Tasmania ) यांच्यातल्या या सामन्यात या लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली. जॅक्सन बर्डनं १८ धावांत ७ विकेट्स घेताना तस्मानिया संघाला ३०० धावांची आघाडी मिळवून दिली.
शेफिल्ड शील्ड स्पर्धेतील ( Sheffield Shield ) या सामन्यात न्यू साऊथ वेल्स संघाचा संपूर्ण डाव १९.३ षटकांत ३२ धावांवर गडगडला. शेफिल्ड शील्ड स्पर्धेतील ही चौथी निचांक खेळी आहे. यापूर्वी १८६८-६९ साली न्यू साऊथ वेल्स संघ ३७ धावांवर तंबूत परतला होता.  


न्यू साऊथ वेल्सला ऑस्ट्रेलियाकडून ९ कसोटी सामने खेळणाऱ्या जॅक्सन बर्डनं धक्के दिले. त्यानं १८ धावांत ७ विकेट्स घेतल्या. त्यानं चार फलंदाजांना खाते न उघडताच माघारी पाठवले.  त्यानं १० षटकांपैकी ५ षटकं निर्धाव फेकली. यासह त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स पूर्ण केल्या.  तस्मानिया संघानं पहिल्या डावात ३३३ धावा केल्या. कर्णधार मॅथ्यू वेड ( ५७), टीम पेन ( ८७) व जॅक्सन बर्ड ( ५४) यांनी अर्धशतकी खेळी केली. 

तस्मानियाकडून सर्वोत्तम गोलंदाजी
८-९५ - पीटर क्लॉघ, १९८३-८४
७-१८ - जॅक्सन बर्ड, २०२०-२१
७-४५ - जॅक्सन बर्ड, २०१५-१६ 
७-४९ - कॉलीन मिलर, १९९७-९८
७-५४ - अॅडम ग्रिफिथ, २००४-०५ 

Web Title: New South Wales bundled out for just 32 runs against Tasmania in Sheffield Shield with Jackson Bird taking 7 for 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.