India vs England, 4th Test : टीम इंडियानं गाजवला पहिला दिवस, पण गमावली महत्त्वाची विकेट

India vs England, 4th Test : भारताचे फिरकीपटू अक्षर पटेल ( Axar Patel), आर अश्विन ( R Ashwin) आणि वॉशिंग्टन सूंदर ( Washington Sunder) यांनी इंग्लंडला दणके दिले.

By स्वदेश घाणेकर | Published: March 4, 2021 05:01 PM2021-03-04T17:01:00+5:302021-03-04T17:03:10+5:30

whatsapp join usJoin us
India vs England, 4th Test: India reach 24/1 (Pujara 15*, Anderson 1/5) at stumps on Day 1, trail England by 181 runs | India vs England, 4th Test : टीम इंडियानं गाजवला पहिला दिवस, पण गमावली महत्त्वाची विकेट

India vs England, 4th Test : टीम इंडियानं गाजवला पहिला दिवस, पण गमावली महत्त्वाची विकेट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देअक्षर पटेलनं ६८ धावा देताना चार महत्वाच्या विकेट्स घेतल्या. आर अश्विननं तीन, मोहम्मद सिराजनं दोन आणि वॉशिंग्टन सुंदरनं १ विकेट घेतली

India vs England 4th test cricket : नाणेफेकीचा कौल बाजूनं लागला... फलंदाजांना पोषक खेळपट्टी... असे असूनही इंग्लंडच्या फलंदाजांना चौथ्या कसोटीत पहिल्या दिवशी खेळणे अवघडच गेले. ( Ind vs Eng live test score from Narendra Modi Stadium) भारताचे फिरकीपटू अक्षर पटेल ( Axar Patel), आर अश्विन ( R Ashwin) आणि वॉशिंग्टन सूंदर ( Washington Sunder) यांनी इंग्लंडला दणके दिलेच. पण, जसप्रीत बुमराहच्या जागी स्थान मिळालेल्या मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) यानेही सामना गाजवला. इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर गडगडला, परंतु टीम इंडियालाही एक धक्का बसला आहे. दिवसअखेर भारतानं १ बाद २४ धावा केल्या आहेत. PSL Food : पाकिस्तान सुपर लीगमध्ये मिळतं निकृष्ट जेवण; इंग्लंडच्या खेळाडूकडून पोलखोल!

मॅचचे हायलाईट्स
- पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इशांत शर्मानं इंग्लंडचा सलामीवीरासाठी पायचीतची अपील केलं. मैदानावरील पंचांनी नाबाद दिल्यानंतर विराट कोहलीनं DRS घेतला, परंतु त्याचा फार काही उपयोग झाला नाही. ind vs eng live score from narendra Modi stadium, test cricket

- सहाव्या षटाकात कोहलीनं अक्षर पटेलला बोलावलं अन् अक्षरनं पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. डॉम सिब्ली ( २) त्रिफळाचीत झाला. त्यानंतर पुढच्या षटकात अक्षरनं इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅव्ली ( ९) याला चूक करण्यास भाग पाडले आणि इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर १५ धावांवर माघारी परतले. मोहम्मद सिराजनं डिवचले अन् विराट कोहली - बेन स्टोक्स एकमेकांना भिडले, Video

-  त्यानंतर मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याला माघारी पाठवून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. पण, ३ बाद ३० धावांवरून इंग्लंडचा डाव बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो यांनी सावरला. बेन स्टोक्सनं २४वे कसोटी अर्धशतक झळकावताना बेअरस्टोसह ४८ धावांची भागीदार केली. ind vs eng 4th test

- स्टोक्सनं ऑली पोपसह ४३ धावांची भागीदारी केली. पण, वॉशिंग्टन सुंदरनं त्याला बाद केले. स्टोक्स १२१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकार खेचून ५५ धावांवर माघारी परतला.Someone is getting angry; रिषभ पंतनं यष्टिंमागून चिडवलं अन् इंग्लंडच्या फलंदाजानं केली चूक

- डॅन लॉरेन्स आणि पोप यांचीही जोडी जमली आणि त्यांनी ४५ धावा जोडल्या. पण ही दोघं माघारी परतल्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला. लॉरेन्स ४६, तर पोप २९ धावांवर माघारी परतले.  India vs England 4th test cricket

- अक्षर पटेलनं चार, आर अश्विननं ३, मोहम्मद सिराजनं २ आणि वॉशिंग्टन सूंदरनं १ विकेट घेतली. इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर गडगडला. चल फूट!; सुनील गावस्कर संतापले अन् लाईव्ह सुरू असताना खडेबोल सुनावले

- २०५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारताला पहिल्याच षटकात जेम्स अँडरसननं धक्का दिला. शुबमन गिल ( ०) माघारी परतला. घरच्या मैदानावर एकाच कसोटी मालिकेत दोन वेळा शून्यावर बाद होणारा गिल हा पाचवा भारतीय सलामीवीर ठरला. यापूर्वी एमएल जैसिम्हा ( वि. ऑस्ट्रेलिया, १९६४), फारूख इंजिनियर्स ( वि. वेस्ट इंडिज, १९७४-७५), सुनील गावस्कर ( वि. वेस्ट इंडिज, १९८३), शिखर धवन ( वि. द. आफ्रिका, २०१५) यांना अपयश आलं होतं.

- रोहित शर्मा ( ८ ) व चेतेश्वर पुजारा (१५ ) खेळत आहेत. भारत अजूनही १८१ धावांनी पिछाडीवर आहे. 

Web Title: India vs England, 4th Test: India reach 24/1 (Pujara 15*, Anderson 1/5) at stumps on Day 1, trail England by 181 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.