Alex Hales indirectly trolls PCB by posting picture of poor quality food offered to him | PSL Food : पाकिस्तान सुपर लीगमध्ये मिळतं निकृष्ट जेवण; इंग्लंडच्या खेळाडूकडून पोलखोल!

PSL Food : पाकिस्तान सुपर लीगमध्ये मिळतं निकृष्ट जेवण; इंग्लंडच्या खेळाडूकडून पोलखोल!

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( PCB) गुरुवारी पाकिस्तान सुपर लीग ( PSL-6) स्थगित झाल्याची घोषणा केली. लीगमधील 6 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट समोर आल्यानं हा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तान सुपर लीग ही इंडियन प्रीमिअर लीगपेक्षा चांगली असल्याचे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेन यानं व्यक्त केलं होतं. पण, टीका झाल्यानंतर त्यानं माफिही मागितली. त्यात गुरूवारी इंग्लंडचा फलंदाज अॅलेक्स हेल्स ( Alex Hales) यानं PSL मध्ये खेळाडूंना देणाऱ्या येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या खाण्यावरून PCBला ट्रोल केले. इंग्लंडचा डाव पहिल्या दिवशीच गडगडला; अक्षर पटेल, आर अश्विन पुन्हा चमकले

पाकिस्तान सुपर लीगमध्ये कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत सात जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यापैकी ६ खेळाडू आहेत. त्यानंतर फ्रँचायझी मालकांनी बैठक घेतल आणि ही लीग स्थगित करण्याचा निर्णय झाला. कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंमध्ये इंग्लंडच्या टॉम बँटनचा समावेश आहे.  कराची किंग्स, पेशावर झाल्मी, मुल्तान सुल्तान्स किंवा क्युएत्ता ग्लॅडीएटर्स या संघातील खेळाडूंनी कोरोना नियम मोडल्याची चर्चा आहे. स्पर्धा नियमानुसार कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंना १० दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. कराची किंग्सचा स्टाफ सदस्य कामरान खान यांनाही कोरोना झाला आहे.  जसप्रीत बुमराहची 'नवरी' राजकोटसाठी रवाना; दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत घेणार सात फेरे?

20 फेब्रुवारीपासून PSLला सुरुवात झाली आणि 34 सामन्यांपैकी आतापर्यंत 14 सामनेच झाले आहेत. हेल्सनं PSLमध्ये इस्लामाबाद युनायटेड कॅम्पकडून खेळतो आणि त्यानं गुरुवारी इस्टा स्टोरीवर PSLमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाचा फोटो पोस्ट केला.    

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Alex Hales indirectly trolls PCB by posting picture of poor quality food offered to him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.