India vs England 1st Test Live : ... अन् भर मैदानात विराट कोहलीला वाजवाव्या लागल्या रिषभ पंतसाठी टाळ्या, Video 

india vs England 2021 1st test match live cricket score : भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली. पाच ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 06:29 PM2021-08-04T18:29:54+5:302021-08-04T18:30:27+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 1st Test Live Cricket Score : Virat Kohli clapping for Rishabh Pant for convincing him for the review, Video  | India vs England 1st Test Live : ... अन् भर मैदानात विराट कोहलीला वाजवाव्या लागल्या रिषभ पंतसाठी टाळ्या, Video 

India vs England 1st Test Live : ... अन् भर मैदानात विराट कोहलीला वाजवाव्या लागल्या रिषभ पंतसाठी टाळ्या, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

india vs England 2021 1st test match live cricket score : भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नॉटिंगहॅम येथे सुरू झाला अन् भारतानं पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडच्या दोन फलंदाजांना ६२ धावांवर माघारी पाठवले. आर अश्विन आणि इशांत शर्मा या दोन प्रमुख गोलंदाजाशिवाय टीम इंडिया मैदानावर उतरल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण, पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. त्यात एक मजेशीर किस्साही घडला, त्यामुळे कर्णधार विराट कोहलीला भर मैदानावर रिषभ पंतसाठी टाळ्या वाजवाव्या लागल्या. लंच ब्रेकनंतर मोहम्मद शमीनं इंग्लंडला तिसरा धक्का दिला.India vs England 1st Test Live, India vs England 1st Test

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीसामन्यापासून सुरुवात झाली. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात त्यांना धक्का दिला. रोरी बर्न्स पाचव्याच चेंडूवर पायचीत होऊन भोपळ्यावर माघारी परतला. त्यानं डॉम सिब्ली व झॅक क्रॅवली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. इशांत शर्माच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद सिराजनं त्याची विकेट घेतली. सिराजचा इनस्वींग चेंडूनं क्रॅवलीच्या बॅटची कड घेत यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हाती झेपावला. Ind vs Eng 1st Test live, Eng vs ind 1st test live score

मैदानावरील पंचांनी भारतीयांच्या अपीलकडे दुर्लक्ष करताना क्रॅवलीला नाबाद दिले. त्यानंतर रिषभ पंत कर्णधार कोहलीकडे गेला अन् त्याला DRS घेण्यासाठी विनवणी करू लागला. कोहलीनं अन्य खेळाडूंकडे पाहत अखेरच्या क्षणाला DRS घेतला अन् त्याचं फळ मिळालंही. क्रॅवलीला २७ धावांवर माघारी जावं लागलं. रिषभ पंतचा हट्ट पुरवण्याचा टीम इंडियाला फायदा झाल्याचे पाहून कोहलीनं भर मैदानात त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. Eng vs Ind 1st test live score board, Ind vs End 1st test match live
 

पाहा व्हिडीओ...






 
शुबमन गिल आणि मयांक अग्रवाल यांच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासह पहिल्या कसोटीत लोकेश राहुल सलामीला येणार आहे. भारतानं आजच्या सामन्यात आर अश्विन, इशांत शर्मा यांना प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर बसवले आहे आणि त्यांच्याजागी लोकेश राहुल, शार्दूल ठाकर व मोहम्मद सिराज यांना संधी दिली आहे

Web Title: India vs England 1st Test Live Cricket Score : Virat Kohli clapping for Rishabh Pant for convincing him for the review, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.