IND vs AUS Live Streaming: महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला ३० सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. या मोठ्या स्पर्धेआधी भारतीय महिला संघ घरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १४ सप्टेंबरला मुल्लांपुर स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. इथं जाणून घेऊयात हा सामना नेमका किती वाजता सुरु होणार? मोबाइवर या मॅचचा आनंद क्रिकेट चाहत्यांना कुठं घेता येईल? यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!IND vs AUS यांच्यातील पहिला वनडे सामना किती वाजता सुरु होणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघातील पहिला एकदिवसीय सामना रविवारी, १४ सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार, दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल. हा सामना न्यू चंडीगड येथील मुल्लांपुर स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
क्रिकेट चाहत्यांना कुठं अन् कसा घेता येईल या सामन्याचा आनंद?
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघातील वनडे मालिकेतील सामन्यांचे थेट प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून होईल. याशिवाय Jio स्टार अॅप आणि वेबसाइटवर क्रिकेट चाहते लाइव स्ट्रीमिंग (Live Streaming) सह या सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
वर्ल्ड कप स्पर्धेआधी दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण ठरेल ही मालिका
या मालिकेत भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. भारताची उप कर्णधार स्मृती मानधनाच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजरा असतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व हे एलिसा हीली करणार आहे. ही मालिका वनडे वर्ल्ड कपआधी दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण असेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडेसाठी भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप कप्तान), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रेणुका सिंह ठाकुर, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष (विकेट कीपर), क्रांती गौड़, सयाली सतघरे, राधा यादव, श्री चरणी, स्नेह राणा, उमा छेत्री (विकेट कीपर)
ऑस्ट्रेलिया महिला संघ
एलिसा हीली (कर्णधार), निकोल फाल्टम, फोएबे लिचफील्ड, बेथ मूनी, जॉर्जिया वोल, ताहलिया मॅकग्राथ (उप कप्तान), एश्ले गार्डनर, किम गार्थ, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, चार्ली नॉट, एलिस पेरी, एनाबेल सदरलँड, डार्सी ब्राउन, सोफी मोलिनक्स, मेगन शुट्ट, जॉर्जिया वेयरहॅम