भारत आणि ऑस्ट्रेलिया प्राइम मिनिस्टर XI यांच्यातील पिंक बॉल वॉर्मअप मॅचमधील पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. पहिल्या दिवसाच्या खेळात टॉसही झाला नाही. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ॲडलेडच्या मैदानातील दिवस रात्र कसोटी सामन्याआधी भारतीय संघ कॅनबेराच्या मैदानात दोन दिवसीय सराव सामना खेळणार होता. या सराव सामन्यातील पहिला दिवस वाया गेल्यानंतर आता या दोन दिवसीय प्रॅक्टिस मॅचमध्ये नवे ट्विस्ट आले आहे. कारण दुसऱ्या दिवशी दोन्ही संघ ५०-५० षटकांचा सामना खेळताना दिसेल.
दोन दिवसांतील पहिला दिवस गेला वाया; पिंक बॉल टेस्टला वनडेचं ट्विस्ट
बीसीसीआयने अधिकृत एक्स अकाउंटवरुन भारत आणि ऑस्ट्रेलियन प्राइम मिनिस्टर इलेव्हन यांच्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळासंदर्भातील अपडेट्स दिले आहेत. बीसीसीआयने पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेल्यावर दुसऱ्या दिवशी टॉस कधी होणार आणि सामना किती षटकांचा खेळवला जाणार यासंदर्भातील माहिती दिलीये. दोन्ही संघ ५०-५० षटकांचा सामना खेळण्यासाठी राजी झाले आहेत, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
टेस्ट आधी पिंक बॉल वनडे!
भारतीय प्रमाणवेळेनुसार, रविवारी १ डिसेंबरला सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया प्राइम मिनिस्टर यांच्यातील सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार मैदानात उतरतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲडलेड कसोटी सामन्याआधी मॅच प्रॅक्टिसच्या रुपात हा वनडे ट्विस्टवाला सामना टीम इंडियाला किती उपयुक्त ठरणार त्याचे उत्तर दुसऱ्या कसोटी सामन्यातच मिळेल.
बुमराहच्या नेतृत्वाखाली मैदान मारलं, आता रोहितसमोर विजय रथ पुढे नेण्याचं चॅलेंज
बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली पर्थच्या मैदानात भारतीय संघाने विजयी सलामी दिली होती. रोहित शर्मा पुन्हा संघात सामील झाल्यानंतर हा विजय सिलसाला कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिने हा सामना खूप महत्त्वाचा आहे. याशिवाय भारतीय संघाने आतापर्यंत डे नाइट कसोटीतील एकमेव सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध गमावला आहे. तो रेकॉर्ड सुधारण्याचे एक आव्हानही टीम इंडियासमोर असेल.