India vs Australia ICC Women's World Cup 2025 Match : सलामीची बॅटर स्मृती मानधना ८०(६६) आणि प्रतीका रावल ७५(९६) या दोघींच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील विक्रमी धावसंख्या उभारली . पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरल्यावर सलामी बॅटर्संनी दमदार फटकेबाजीचा नजराणा पेश करत पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी रचली. दोघींनाही शतकाची संधी होती, पण एकीलाही तो डाव साधता आला नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्मृतीसह प्रतीकाकडेही शतकाची संधी होती, पण...
स्मृती मानधना यंदाच्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पहिले शतक झळकावेल, असे वाटत असताना ती ८० धावांवर बाद झाली. प्रतीकाची खेळीही ७५ धावांवरच थांबली. या दोघींनी भक्कम पाया रचल्यावर भारतीय महिला संघ ३५० धावा सह धावफलकावर लावेल, अशी आस होती. पण तळाच्या फलंदाजीत ठराविक अंतराने विकेट पडल्या. हरलीन देओल ३८ (४२,) हरमनप्रीत कौर २२ (१७) जेमिमा रॉड्रिग्स २१ (३३) आणि रिचा घोष यांनी ३२ (३२) केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियासमोर ३३१ धावांचे टार्गेट सेट केले आहे. ३०० पारच्या लढाईत ऑस्ट्रेलियाकडून ॲनाबेल सदरलँड हिने ५ विकेट्स घेत लक्षवेधून घेतलं. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाच विकेट्स घेणारी ती पहिली गोलंदाज ठरली.
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
भारतीय महिला संघाचा वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड
क्रमांक | धावसंख्या | प्रतिस्पर्धी संघ | मैदान | वर्ष |
---|
१ | ३३० धावा | ऑस्ट्रेलिया महिला | विशाखापट्टणम | २०२५* |
२ | ३१७/८ | वेस्ट इंडिज महिला | हॅमिल्टन | २०२२ |
३ | २८४/६ | वेस्ट इंडिज महिला | ब्रेबॉर्न (मुंबई) | २०१३ |
४ | २८१/३ | इंग्लंड महिला | डर्बी | २०२२ |
५ | २८१/४ | ऑस्ट्रेलिया महिला | डर्बी | २०२२ |
वनडेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वोच्च धावसंख्या उभारणारे संघ
वनडे क्रिकेट आणि वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिला आहे. ५० षटकांच्या खेळात फक्त भारतीय संघ एकमेव असा संघ आहे ज्यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा ऑस्ट्रेलियासमोर ३०० धावा केल्या आहेत. अन्य कोणत्याही संघाला अशी कामगिरी करणं जमलेले नाही.
क्रमांक | धावसंख्या | संघ | मैदान | वर्ष | डाव |
---|
१ | ३६९ धावा | भारत महिला | दिल्ली | २०२५ | दुसरा डाव |
२ | ३३० धावा | भारत महिला | विशाखापट्टणम | २०२५ वर्ल्ड कप | पहिला डाव |
३ | २९८/८ | इंग्लंड महिला | हॅमिल्टन | २०२२ वर्ल्ड कप | दुसरा डाव |
४ | २९२ धावा | भारत महिला | न्यू चंदीगड | २०२५ | पहिला डाव |
५ | २८८/६ | न्यूझीलंड महिला | नॉर्थ सिडनी | २०१२ | पहिला डाव |