घरच्या मैदानात रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय टी-२० संघाची घोषणा केली. धावांसाठी संघर्ष करत असणारा टी-२० संघाचा उप कर्णधाराला संघाबाहेर काढण्यात आलं. पण सूर्यकुमार यादव खराब फॉर्मशी झुंजत असताना नेतृत्वाच्या रुपात त्याच्यावर भरवसा दाखवण्यात आला. सूर्यकुमार यादव हा वर्षभर धावांसाठी संघर्ष करताना दिसला आहे. पण त्याच्या नेतृत्वाखालील संघाने एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. याच एका सूत्रावर सूर्याचे संघातील स्थान टिकून आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूर्यकुमार यादवला बाउन्सर, मग...
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघाची घोषणा झाल्यावर सूर्यकुमार यादवनं १५ सदस्यीय संघावर समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया दिली. याशिवाय त्याने तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार तेही स्पष्ट केले. पण ज्यावेळी त्याला बॅटिंग फॉर्मसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी तो निशब्द झाला. त्याने चेंडू थेट आगरकरांच्या कोर्टात टोलवला. नेमकं काय घडलं? सूर्याला विचारलेल्या प्रश्नावर मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी काय उत्तर दिले जाणून घेऊयात सविस्तर
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
फार्मच काय? सूर्या म्हणाला मी काय बोलणार?
वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या निवडीनंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी एका पत्रकाराने सूर्याला त्याच्या फॉर्मच्या संदर्भात प्रश्न विचारला. यावर भारतीय टी-२० संघाचा कर्णधार निशब्द झाला. यावर मी काय बोलणार? असा प्रतिप्रश्न उपस्थितीत करत याचे उत्तर मुख्य निवडर्ते अजित आगरकरच देऊ शकतील असे सांगितले.
कॅप्टनवर मुख्य निवडकर्ते आगरकरांनी व्यक्त केला विश्वास
सूर्याच्या फॉर्मसंदर्भात अजित आगरकर म्हणाले की, सध्याच्या घडीला तो फॉर्ममध्ये नाही ही गोष्ट खरी आहे. पण याआधी त्याने टी-२० मध्ये धमक दाखवून दिली आहे. टी-२० तील तो वर्ल्ड नंबर वन बॅटर राहिला आहे. वर्ल्ड कपमध्ये पुन्हा त्याचा तोच अवतार पाहायला मिळेल. तो पुन्हा नंबर वन होईल, असा विश्वास आगरकरांनी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.