India Squad For 2025 Asia Cup Why Abhishek Sharma Is A Non Negotiable As Opener : आशिया कप २०२५ स्पर्धसाठी भारतीय संघ निवडीसाठी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर आगरकर यांच्यासह टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेत आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय टी-२० संघाची घोषणा करणार आहे. १५ सदस्यीय संघात स्थान मिळवण्यासाठी तगडी स्पर्धा असेल. यात काही खेळाडू अगदी सेफ झोनमध्ये आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिषेक शर्मा. भारतीय टी-२० संघात सलामीवीराच्या रुपातील एक स्लॉट त्याने बुक करुन ठेवलाय. छोट्या फॉर्मेटमध्ये अल्पावधित मोठा धमाका करून त्याने ओपनिंगच्या जागेवर रुमाल टाकलाय. इथं जाणून घेऊयात टी-२० क्रिकेटमध्ये तो सर्वोत्तम पर्याय ठरण्यामागची काही कारणं....
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हा युवा स्फोटक बॅटर प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडतो
अभिषेक शर्मा हा सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. बिनधास्त अंदाजात उत्तुंग फटकेबाजीसह त्याने आपली खास छाप सोडलीये. संघ व्यवस्थापनाने देखील या युवाला तुफान फटकेबाजीसाठी मोकळीक दिलीये. झिम्बाब्वे विरुद्धच्या टी-२० सामन्यात ४६ चेंडूतील शतकासह इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतही तो चमकला होता.
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
रेकॉर्ड ब्रेक कामगिरी
टी-२० क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या वादळी शतकी खेळीशिवाय इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातही त्याने १३५ धावांची विक्रमी खेळी केली होती. भारतीय संघाकडून कोणत्याही सलामीवीरानं केलेली ही आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. १७ टी-२० सामन्यात त्याने २ शतकासह २ अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळेच तो टी-२० संघात सलामीवीराच्या रुपात सर्वोत्तम पर्याय ठरतो.
टी-२० तील नंबर वन बॅटर
अभिषेक शर्मा हा आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाज ट्रॅविस हेडला मागे टाकत तो नंबर वनवर विराजमान झालाय. त्याची ही कामगिरीही त्याचे संघातील स्थान फिक्स करण्यासाठी पुरेशी ठरते.
अभिषेक शर्मासोबत कोण?
आशिया कप स्पर्धेसाठी अभिषेक शर्मा हा टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करणार हे फिक्स आहे, पण त्याच्यासोबत कोण असणार याचं कोडं निवडकर्त्यांना सोडवावे लागणार आहे. दुसऱ्या सलामीवीराच्या रुपात संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल यांच्यासह शुबमन गिल हे पर्याय उपलब्ध आहेत. शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल कसोटी क्रिकेटमुळे वर्षभर टी-२० संघातून बाहेर आहेत. या काळात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी हिट ठरलीये. हाच प्रयोग आशिया कपमध्ये कायम दिसणार की, यात बदल होणार ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: India Squad For 2025 Asia Cup Know About Why Abhishek Sharma Is A Non Negotiable As Opener For Team India In T20I
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.