India Semi Final Scenario After Win Against Zimbabwe In T20 World Cup 2026 : गतविजेत्या भारतीय संघाने चेन्नईतील चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या सुपर ८ फेरीतील झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात दिमाखदार विजय नोंदवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना धमाकेदार कामगिरीसह टीम इंडियाने निर्धारित २० षटकात २५६ धावा करत टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ १८६ धावांपर्यतच मजल मारू शकला. टीम इंडियाने ७२ धावांनी सामना जिंकत सेमीच्या दिशेनं पाऊल टाकले आहे. इथं जाणून घेऊयात टीम इंडियाच्या सेमीफायनलच समीकरण...
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मोठं संकट टळलं, आता हा अडथळा करावा लागेल दूर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून सेमीच्या शर्यतीतून बाहेर पडेल, असे समीकरण तयार झाले होते. त्यातन 'नेट रनरेट' टीम इंडियाचा घात करू शकतो हा मुद्दा चांगलाच गाजला. पण आता मोठं संकट टळलं आहे. आता टीम इंडियाला स्वबळावर सेमीफायनल गाठणं शक्य आहे. यासाठी फक्त एक सामना जिंकायचा आहे. वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात सुपर ८ फेरीतील अखेरचा सामना खेळवण्यात येणार आहे. रविवारी १ मार्चला रंगणारा हा सामना जिंकला की, टीम इंडिया सेमीफायनलसाठी पात्र ठरेल.
South Africa Into Semi Final : भारताचा विजय अन् मदतीला धावलेल्या दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीफायनलचं तिकीट
एक चूक अन् स्पर्धेतून आउट
सुपर ८ फेरीतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात चूक म्हणजे स्पर्धेतून आउट. त्यामुळे इथं चुकीला माफी नाही. भारतीय संघ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीसाठी महत्त्वपूर्ण असलेला हा सामना कोलकाता येईल ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळणार आहे. या मैदानात वेस्ट इंडिजचा रेकॉर्ड चांगला आहे. यंदाच्या हंगामात या संघानेही भारताप्रमाणेच फक्त एक सामना गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघातील सामना रोमहर्षक होईल.
सुपर ८ फेरीतील पहिल्या गटातील एक सेमीफायनलिस्ट ठरला, एका जागेसाठी दोघांमध्ये स्पर्धा
- दक्षिण आफ्रिका- २ पैकी २ विजयासह सेमीफायनलसाठी पात्र
- झिम्बाब्वे- २ पैकी २ पराभवासह स्पर्धेतून बाहेर
- भारतीय संघ- २ पैकी १ विजय अखरेचा सामना ठरवणार स्पर्धेतील भविष्य
- वेस्ट इंडिज- २ पैकी १ विजय अखरेचा सामना ठरवणार स्पर्धेतील भविष्य