India Playing XI for ICC WTC Final: टीम इंडियाची रणनीती ठरली, 3 जलदगती व 2 फिरकीपटूंसह उतरणार मैदानावर!

India Playing XI – ICC WTC Final: आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 11:07 AM2021-06-14T11:07:10+5:302021-06-14T11:08:54+5:30

whatsapp join usJoin us
India Playing XI – ICC WTC Final: It’s almost final, India to play 3 pacers & 2 spinners against New Zealand | India Playing XI for ICC WTC Final: टीम इंडियाची रणनीती ठरली, 3 जलदगती व 2 फिरकीपटूंसह उतरणार मैदानावर!

India Playing XI for ICC WTC Final: टीम इंडियाची रणनीती ठरली, 3 जलदगती व 2 फिरकीपटूंसह उतरणार मैदानावर!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे18 ते 23 जून या कालावधीत साऊदॅम्पटन येथे रंगणार अंतिम सामना WTC final पूर्वी न्यूझीलंडनं यजमान इंग्लंडवर मिळवला 1-0 असा कसोटी मालिका विजय

India Playing XI – ICC WTC Final: आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. ( ICC World Test Championship Final against New Zealand ). विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी फायनलसाठी जवळपास संघ निश्चित केला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघानं चार दिवसांचा सराव सामना खेळला आणि त्यात रिषभ पंत, लोकेश राहुल, शुबमन गिल व रोहित शर्मा यांनी मोठी खेळी केली. पण, गोलंदाजी विभागात निवड करताना विराट व शास्त्री यांच्यासमोर मोठं आव्हान होतं. सुरुवातीला भारतीय संघ चार जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडिया तीन जलदगती गोलंदाज व 2 फिरकीपटूंसह मैदानावर उतरणार आहेत. 

इंग्लंडमधील खेळपट्टी जलदगती गोलंदाजांसाठी पोषक असल्या तरी भारतीय संघ त्यांच्या मजबूत बाजूसह म्हणजेच फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरण्यासाठी तयार आहे. त्यामुळे अंतिम अकरामध्ये रवींद्र जडेजा व आर अश्विन यांची निवड पक्की मानली जात आहे. ( Ravindra Jadeja and Ravichandran Ashwin in the XI). जलदगती गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांची निवड पक्की मानली जात आहे. तिसऱ्या जागेसाठी इशांत शर्मा, मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळेल. अंतिम सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी ही जलदगती व फिरकी या दोघांनाही मदत करणारी असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पहिल्या तीन दिवसांत जलदगती गोलंदाजांचे वर्चस्व असेल, तर उर्वरित दोन दिवशी फिरकी गोलंदाज कमाल दाखवतील.

 एक नंबर!, न्यूझीलंडचा WTC Final पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 22 वर्षानंतर नोंदवला विक्रम

2018मध्ये साऊदॅम्पट येथे झालेल्या कसोटीत इंग्लंड आदील राशिद व मोईन अली या दोन फिरकी गोलंदाजांसह भारताविरुद्ध मैदानावर उतरला होता. या दोघांनी मिळून 9 विकेट्स घेतल्या होत्या, तर भारताच्या आर अश्विननं तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे टीम इंडियाचे व्यवस्थापन मंडळ दोन फिरकीपटूंना खेळवण्याच्या पक्षात आहेत. जडेजा व अश्विन यांच्या समावेशामुळे फलंदाजीतही मदत मिळणार आहे. इशांत शर्माकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा सर्वाधिक अनुभव आहे आणि मागील इंग्लंड दौऱ्यावर त्यानं 18 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकासाठी त्याचे स्थान निश्चित मानले जात आहे. पण, विराट कोहली व रवी शास्त्री खेळपट्टीचा अंदाज पाहून अखेरच्या क्षणाला 3+2 हे समीकरण बदलू शकतात.

Big U-Turn : आयपीएलच्या पुढील पर्वात 10 संघ, लीगसाठी अधिकच्या विंडोसाठी आयसीसीसमोर झुकली बीसीसीआय


ICC WTC Final – India’s likely Playing XI: सलामीवीर - रोहित शर्मा, शुबमन गिल, मधली फळी - चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, फिरकीपटू - रवींद्र जडेजा, आर अश्विन, जलदगती गोलंदाज - मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा  

Web Title: India Playing XI – ICC WTC Final: It’s almost final, India to play 3 pacers & 2 spinners against New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.