ENG vs NZ 2nd Test : एक नंबर!, न्यूझीलंडचा WTC Final पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 22 वर्षानंतर नोंदवला विक्रम

ENG vs NZ 2nd Test : New Zealand beat England and win a series by 1-0 इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत किवींनी 1-0 असा विजय मिळवला. केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडनं दुसरी कसोटी जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 04:47 PM2021-06-13T16:47:41+5:302021-06-13T17:01:31+5:30

whatsapp join usJoin us
ENG vs NZ 2nd Test : New Zealand becomes the new number 1 Test team in the world, they beat England and win a series by 1-0  | ENG vs NZ 2nd Test : एक नंबर!, न्यूझीलंडचा WTC Final पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 22 वर्षानंतर नोंदवला विक्रम

ENG vs NZ 2nd Test : एक नंबर!, न्यूझीलंडचा WTC Final पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 22 वर्षानंतर नोंदवला विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England vs New Zealand, 2nd Test : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी ( WTC Final) न्यूझीलंड संघानं मोठी झेप घेतली. इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत किवींनी 1-0 असा विजय मिळवला. केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडनं दुसरी कसोटी जिंकली. तब्बल 22 वर्षांनी न्यूझीलंडनं इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम केला. याआधी 1999मध्ये स्टीफन फ्लेमिंगच्या नेतृत्वाखाली किवींनी 2-1 अशी मालिका जिंकली होती. 7 वर्षांनंतर इंग्लंडनं घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली. ( New Zealand win the Edgbaston Test by 8 wickets and register their first series victory in England since 1999. ) 


इंग्लंडच्या पहिल्या डावातील 303 धावांच्या उत्तरात न्यूझीलंडनं 388 धावा केल्या. रोरी बर्न्स आणि डॅन लॉरेन्स यांनी प्रत्येकी 81 धावा करून इंग्लंडचा डाव सावरला. ट्रेंट बोल्टने 4, मॅट हॅन्री 3 आणि अजाझ पटेलनं 2 विकेट्स घेतल्या. किवीकडून पहिल्या डावात डेव्हॉय कोनवे ( 80), विल यंग ( 82) आणि रॉस टेलर ( 80) यांनी अर्धशतकी खेळी केली. स्टुअर्ट ब्रॉडनं 4, मार्क वूड व ऑली स्टोन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. इंग्लंडला दुसऱ्या डावात 122 धावाच करता आल्या आणि किवींसमोर 38 धावांचं माफक लक्ष्य उभे राहिले. मॅट हेन्री ( 3) व नील वॅगनर ( 3) यांनी दुसऱ्या डावात इंग्लंडला हैराण केलं. ट्रेंट बोल्ट व अजाझ पटेल यांनीही प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. किवींनी 2 विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य सहज पार केले.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान, टीम इंडियाला दिला धक्का
या मालिका विजयानंतर न्यूझीलंडनं आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. त्यांनी टीम इंडियाला दुसऱ्या स्थानी मागे खेचले. या मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या खात्यात 120 गुण होते, तर टीम इंडियाकडे 121 गुण. आता न्यूझीलंडकडे 123 गुण झाले आहेत. न्यूझीलंडचा संघ वन डे क्रमवारीतही अव्वल स्थानावर आहे, तर ट्वेंटी-20त तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

Web Title: ENG vs NZ 2nd Test : New Zealand becomes the new number 1 Test team in the world, they beat England and win a series by 1-0 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.