Join us
Daily Top 2Weekly Top 5

U 19 World Cup 2026 : 'सुपर सिक्स'मध्ये भारताचा 'चौकार'; पाकिस्तानला स्पर्धेबाहेर काढत मिळवले सेमीचे तिकीट

भारतीय संघाने पाकिस्तानचा खेळ केला खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 23:09 IST

Open in App

India vs Pakistan U 19 World Cup 2026 IND Beats PAK And Enter Semi Final : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडियानं अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेतून पाकिस्तान U19 संघाला बाहेर काढले आहे. बुलावायो येथील क्विन्स स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात रविवारी खेळवण्यात आलेल्या 'सुपर सिक्स' फेरीत  भारतीय संघाने विजय चौकार मारत पाकिस्तानचा या स्पर्धेतील खेळ खल्लास करत दिमाखात सेमीफायनल गाठली आहे.  आता ४ फेब्रुवारीला भारतीय संघ हरारेच्या मैदानात अफगाणिस्तानविरुद्ध सेमीफायनल खेळताना दिसेल. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 पाकिस्तानचा खेळ केला खल्लास; युवा टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक

नाणेफेक गमावल्यावर वैभव सूर्यवंशी ३० (२२) आणि विहान मल्होत्रा २१ (४८) स्वस्तात माघारी परतल्यावर  वेदांत त्रिवेदीच्या ६८ (९८) अर्धशतकासह तळाच्या फलंदाजीत कौशिक चौहान ३५ (२९), आरएस आंब्रिश २९ (३८) आणि खलिन पटेल २१ (१५) यांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ४९.५ षटकात २५२ धावा केल्या होत्या. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला हा सामना ३३.३ षटकात जिंकायचा होता. पण भारतीय गोलंदाजांनी १९४ धावांत पाकचा खेळ खल्लास करत सेमीच तिकीट बूक केले. 

Ind vs Pak: पाकिस्तानचा मोठा निर्णय; टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार

फलंदाजीत 'झिरो' ठरलेला आयुष म्हात्रे गोलंदाजीत ठरला 'हिरो'

धावांचा बचाव करताना गोलंदाजीत खिलान पटेल याच्यासह भारतीय संघाचे कर्णधार आय़ुष म्हात्रे याने ३ विकेट्स घेतल्या. फलंदाजीत आयुष म्हात्रेला खातेही उघडता आले नव्हते. या दोघांशिवाय आर आंब्रिश, हेनिल पटेल, कनिष्क चौहान आणि विहान मल्होत्रा याने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

'सुपर सिक्स'मधील चार सेमीफायनलिस्ट कोण?

पाकिस्तान विरुद्धच्या विजयासह भारतीय संघ 'सुपर सिक्स'मधील दुसऱ्या गटात ४ सामन्यातील ४  विजयासह ८ गुण कमावत सर्वोत्तम धावगतीच्या जोरावर अव्वलस्थानावर राहिला. या गटातून इंग्लंडच्या संघानेही ४ पैकी ४ विजयसाह ८ गुण मिळवत सेमीचं तिकीट मिळवलं आहे. सुपर सिक्समधील पहिल्या गटातून ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहिला. ऑस्ट्रेलियानं सर्वच्या सर्व ४ सामन्यात त अफगाणिस्तानच्या संघाने ४ पैकी ३ सामन्यातील विजयासह सेमीफायनल गाठली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : India U-19 defeats Pakistan, secures semi-final berth in World Cup 2026.

Web Summary : India U-19 team defeated Pakistan in the 'Super Six' stage of the U-19 World Cup 2026, securing a semi-final spot against Afghanistan. Vedant Trivedi's half-century and crucial contributions from lower-order batsmen led India to a total of 252 runs. Ayush Mhatre's three wickets helped restrict Pakistan, sealing India's victory.
टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तानआयसीसीभारतीय क्रिकेट संघआयुष म्हात्रेवैभव सूर्यवंशी