Join us

आज भारत अन् दक्षिण अफ्रिकेत रंगणार पहिला टी-२० सामना; जाणून घ्या, संभाव्य Playing XI

IND vs SA: आता युवा संघ सलग दुसरी टी-२० मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 11:08 IST

Open in App

आजपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर भारताच्या युवा ब्रिगेडची खडतर कसोटी लागणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने एकदिवसीय विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली. आता युवा संघ सलग दुसरी टी-२० मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे. 

दुखापतग्रस्त कर्णधार हार्दिक पंड्या आयपीएल सुरू होईपर्यंत बाहेर आहे आणि मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ब्रेकवर आहे. याशिवाय, जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या टी-२० भविष्याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने, दक्षिण आफ्रिकेत संघाच्या यश किंवा अपयशाबाबत कोणीही फारसे काही सांगू शकणार नाही.

टी-२० विश्वचषकासाठी भारताच्या मुख्य संघाबाबतची परिस्थिती आयपीएलच्या महिनाभरानंतरच स्पष्ट होईल कारण त्यावेळी खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेस हा निवडीचा निकष असेल. जानेवारीच्या मध्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिका मालिका ही भारताची शेवटची मोठी आंतरराष्ट्रीय टी-२० मालिका असेल.

तिन्ही संघात श्रेयस, मुकेश, इशान यांचा समावेश-

भारताने टी-२० मालिकेसाठी १७ खेळाडू घेतले आहेत आणि त्यापैकी फक्त तीन, श्रेयस अय्यर, मुकेश कुमार आणि इशान किशन हे टी-२०, वन-डे आणि कसोटी संघात सामील आहे. पण संघाला अनेक कठीण समस्यांना सामोरे जावे लागेल ज्यात सलामीवीर आणि तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला गेल्या टी-२० विश्वचषकात भारतासाठी त्रासदायक ठरलेल्या बचावात्मक प्रवृत्ती बदलाव्या लागतील.

ऋतुराजकडे दुर्लक्ष करता येणार नाही

यशस्वीने तो करू शकतो अशी आक्रमक पातळी आधीच दाखवून दिली आहे आणि शुभमन गिल आता सर्व फॉरमॅटमध्ये पहिली पसंती बनला आहे, तर ऋतुराज गायकवाडलाही दुर्लक्ष करणे कठीण जाईल. अडचण अशी आहे की जैस्वाल, गिल आणि गायकवाड या त्रिकुटाने फलंदाजी केली तर चौथ्या क्रमांकानंतर इशान किशन हा फारसा चांगला पर्याय नाही. आणि चौथ्या क्रमांकावर भारताचा नंबर वन टी-२० फलंदाज आणि कर्णधार सूर्यकुमार आहे.

इशानला जितेश आव्हान देईल-

इशान किशनला यष्टीरक्षक पदासाठी जितेश शर्माचे कडवे आव्हान असेल कारण तो सहाव्या क्रमांकावर 'फिनिशर' म्हणून सुधारत असल्याचे दिसत आहे. पाचव्या स्थानावर श्रेयस अय्यरला मार्को जेनसेन, गेराल्ड कोएत्झी आणि अँडिले फेलुक्वायो यांच्या शॉर्ट-पिच चेंडूंकडून आव्हानांना सामोरे जावे लागेल. इशानचा समावेश झाल्यास जितेशला संधी मिळणार नाही कारण दोघेही यष्टिरक्षक फलंदाज आहेत आणि अशा परिस्थितीत रिंकू सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाईल. रुतुराज, जैस्वाल, रिंकू आणि जितेश यांसारख्या खेळाडूंसाठी किंग्समीडमधील अतिरिक्त बाऊन्स वेगळ्या प्रकारचे आव्हान सादर करेल.

क्लासेन, मिलर, मार्कराम गोलंदाजांना अडचणीत आणू शकतात

दक्षिण आफ्रिकेचा मुख्य वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर अॅनरिक नॉर्टजे आणि लुंगी एनगिडी जखमी झाले आहेत, परंतु संघ स्वतःच्याच मैदानावर खूप मजबूत असेल. ऑस्ट्रेलियाने बहुतांश सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजीला आव्हान दिले, पण दक्षिण आफ्रिकेत लांबीचे महत्त्व दुप्पट होईल. क्विंटन डी कॉक दक्षिण आफ्रिकेच्या संघात नसला तरी हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, कर्णधार एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स आणि मॅथ्यू ब्रित्झके हे भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणू शकतात. या मालिकेत रवींद्र जडेजा उपकर्णधार असून त्याच्याकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजी अपेक्षित आहे. दुसरा फिरकीपटू नक्कीच 'गुगली' स्पेशालिस्ट रवी बिश्नोई असेल जो आता जगातील नंबर वन टी-२० स्पिनर आहे. दीपक चहर, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार हे तीन वेगवान गोलंदाजी पर्याय असतील अशी अपेक्षा आहे.

जाणून घ्या, दोन्ही संघाची संभाव्य Playing XI

दक्षिण आफ्रिका: रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रिट्झके, ट्रिस्टन स्टब्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, आंद्रे बर्जर, तबरेझ शम्सी.

भारत : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, दीपक चहर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकासूर्यकुमार अशोक यादवभारतीय क्रिकेट संघ