Join us
Daily Top 2Weekly Top 5

Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

कर्णधार जितेश शर्मानं खणखणीत चौकार मारत संघाचा विजय केला निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 23:28 IST

Open in App

India A vs Oman Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकर हर्ष दुबेनं केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं ओमानच्या संघाला पराभूत करत रायझिंग स्टार टी २० आशिया कप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. दोहाच्या वेस्ट एन्ड पार्क इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ओमानच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद १३५ धावा करत भारत 'अ' संघासमोर १३६ धावांचे टार्गेट सेट केले होते.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बढती मिळाल्यावर विदर्भकर पठ्ठ्यानं संधीचं सोनं करत झळकालं टी-२० कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक 

ओमानच्या संघानं दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्य या जोडीनं भारताच्या डावाची सुरुवात केली. ६ चेंडूत १० धावा करून प्रियांश आर्य स्वस्तात माघारी फिरला. वैभव सूर्यवंशीला या सामन्यात एक जीवनदान मिळालं. पण त्याला त्याचा फायदा उचलता आला नाही. मोठा फटका मारण्याच्या नादात तो १३ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने १२ धावा करून माघारी फिरला. मग नमन धीरची साथ देण्यासाठी हर्ष दुबे मैदानात उतलला. कर्णधार जितेश शर्मा आणि कोच सुनील जोशी यांनी बढती दिल्यावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळणाऱ्या या पठ्ठ्यानं टी-२० कारकिर्दीतील पहिले वहिले अर्धशतक झळकावत आपल्या फलंदाजीतील खास नजराणा पेश केला.  हर्ष दुबेनं या सामन्यात ४४ चेंडूत नाबाद ५३ धावांची मॅच विनिंग खेळी केली. कर्णधार जितेश शर्मानं चौकार मारून भारतीय संघाला ६ विकेट्स आणि १३ चेंडू राखून विजय मिळवून देत सेमी फायनलचं तिकिट पक्के केले.  

ओमानच्या संघाकडून वासीम अलीनं झळकावले नाबाद अर्धशतक

पहिल्यांदा फलंदाजी करताना ओमानच्या संघाचा कर्णधार  हम्मद मिर्झा याने संघाला स्फोटक सुरुवात करुन दिली. विजय कुमार वैशाकनं त्याच्या रुपात भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिले. त्याने १६ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. वासीम अली याने ४५ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५४ धावांची खेळी केली. भारताकडून सूयश शर्मा आणि गुरप्रीत सिंग यांनी प्रत्येकी २-२ तर नमन धीर, हर्ष दुबे आणि विजयकुमार वैशाक यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेत ओमानच्या संघाला १३५ धावांत आटोपले होते. 

पुन्हा एकदा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल?

रायझिंग स्टार टी २० आशिया कप स्पर्धेतील 'ब' गटातून पाकिस्तान अव्वलस्थानावर असून त्यांच्या पाठोपाठ भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहचणारा दुसरा संघ ठरला आहे.  'अ' गटातून अद्याप सेमीच चित्र स्पष्ट झालेले नाही. या गटातून अव्वलस्थानावर राहणारा संघ शुक्रवारी भारतीय संघाविरुद्ध सेमीफायनल खेळताना दिसेल. भारताचा सेमीफायनल सामना दुपारी ३ वाजता रंगणार आहे. याच दिवशी रात्री ८ वाजता पाकिस्तान संघ 'अ' गटातून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या संघासोबत दुसरी सेमीफायनल लढत खेळेल. त्यामुळे  २३ नोव्हेंबरला पुन्हा एकदा भारत-पाक यांच्यात मेगा फायनलचा योगायोग जुळून येऊ शकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Asia Cup: Vidarbha's Dubey shines, India enters semi-finals!

Web Summary : Harsh Dubey's fifty and Suyash Sharma's spin propelled India to the Asia Cup semi-finals, defeating Oman. Dubey's unbeaten 53 secured a six-wicket victory.
टॅग्स :एशिया कपभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ