Shreyas Iyer Lead India A Defeated Australia A By 2 Wickets Seal The Series 2-1 At Kanpur : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय एकदिवसीय संघात उप कर्णधारपदी बढती मिळताच श्रेयस अय्यरनं घरच्या मैदानात आपल्या नेतृत्वातील कर्तृत्व दाखवून दिल आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी श्रेयस अय्यर घरच्या मैदानात रंगलेल्या ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या अनाधिकृत एकदिवसीय मालिकेत भारतीय 'अ' संघाचे नेतृत्व करताना दिसला. कानपूरच्या मैदानात रंगलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात त्याने अर्धशतकी खेळीसह संघाला विजय मिळवून देत घरच्या मैदानात कांगारूंची शिकार केली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ३ सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
श्रेयस अय्यरच्या IPL मधील शिलेदारानं सेट केली मॅच
कानपूरच्या मैदानात रंगलेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन 'अ' संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना कूपर कॉनोली (Cooper Connolly) ४९ (६४), लियम स्कॉट (Liam Scott) ७३ (६४) आणि जॅक एडवर्ड्स (Jack Edwards) ८९ (७४) या त्रिकुटांच्या अर्धशतकाच्या जोरावर ४९.१ षटकात ३१७ धावा करत भारतीय 'अ' संघासमोर ३१८ धावांचे टार्गेट सेट केले होते. ऑस्ट्रेलियन संघाने दिलेल्या धावंसख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा २२ (२५) आणि तिलक वर्मा ३ (६) स्वस्तात आटोपल्यावर प्रभसिमरन सिंग याने ६८ चेंडूत १०२ धावांची खेळी करत कांगारुंच्या ताफ्याला बॅकफूटवर ढकलले. त्याने सामना सेट केल्यावर कर्णधार श्रेयस अय्यर आणि रियान पराग जोडी जमली.
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
अय्यरसह रियान परागच्या भात्यातून आली अर्धशतकी खेळी धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यर आणि रियान परागनं चौथ्या विकेटसाठी ११७ धावांची दमदार भागीदारी रचली. अय्यरनं ५८ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६२ धावांचे योगदान दिले. रियान परागनं ५५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ६२ धावा कुटल्या. सामना सेट झालाय असं वाटत असताना टीम इंडियाने १३ धावांत ३ विकेट्स गमावल्या. शेवटी विपराज निगमनं २४ धावांच्या खेळीसह भारतीय संघाला २ विकेट्स राखून सामन्यासह मालिका जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
Web Summary : Shreyas Iyer led India 'A' to victory against Australia 'A', securing the series 2-0. Iyer's fifty and crucial partnerships with Prabhsimran Singh and Riyan Parag helped chase down the 318-run target. Vipraj Nijam's late heroics sealed the win.
Web Summary : श्रेयस अय्यर ने भारत 'ए' को ऑस्ट्रेलिया 'ए' के खिलाफ जीत दिलाई, श्रृंखला 2-0 से अपने नाम की। अय्यर के अर्धशतक और प्रभसिमरन सिंह और रियान पराग के साथ महत्वपूर्ण साझेदारियों ने 318 रनों के लक्ष्य का पीछा करने में मदद की। विपराज निजम की आखिरी समय की वीरता ने जीत सुनिश्चित की।