India A vs Australia A 3rd unofficial ODI Prabhsimran Singh Smashed 102 Off 68 Balls : कानपूरच्या ग्रीन पार्कच्या मैदानात रंगलेल्याऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ३०० पारच्या लढाईत प्रभसिमरन सिंगनं वादळी शतक झळकावले. ऑस्ट्रेलिया 'अ' संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ३१७ धावा करत भारत 'अ' संघासमोर ३१८ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग या जोडीनं भारताच्या डावाची सुरुवात केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अभिषेकसह तिलकनं तलवार केली म्यान, प्रभसिमरनच्या भात्यातून आलं मॅच सेट करणारं वादळी शतक
अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी रचली. पण आशिया कप स्पर्धा गाजवणारा अभिषेक शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात स्वस्तात तंबूत परतला. त्याने २५ चेंडूत २२ धावांची खेळी केली. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या तिलक वर्मानंही ६ चेंडूत ३ धावांवर आपली विकेट गमावली. अभिषेक अन् तिलक दोघांनी तलवार म्यान केल्यावर प्रभसिरमन सिंगची बॅट तळपली. त्याने ६८ चेंडूत १०२ धावांची मॅच सेट करणारी इनिंग खेळली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ७ उत्तुंग षटकार मारले.
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
पहिल्या वनडेत उपयुक्त अर्धशतकी खेळी
ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या तीन सामन्यांच्या अनऑफिशियल वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात प्रभसिमरन सिंगनं ५३ चेंडूत ५६ धावांची खेळी केली होती. या सामन्यात प्रियांश आर्य आणि भारत 'अ' संघाचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ४१३ धावा करत हा सामना १७१ धावांनी जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात प्रभसिमरन सिंग १० चेडूंचा सामना करून अवघ्या एका धावेवर बाद झाला होता. IPL मध्ये पंजाब किंग्सच्या ताफ्यातून प्रभसिमरन सिंगनं आपला जलवा दाखवून दिला आहे. भारत 'अ' संघाकडून संधी मिळाल्यावर त्याने एक अर्धशतक आणि निर्णायक सामन्यातील शतकी खेळीसह खास छाप सोडल्याचे दिसते.