India A Captain Shreyas Iyer And Priyansh Arya Scores Century Australia A 1st Unofficial ODI : कानपूरच्या ग्रीन पार्कच्या मैदानात भारत 'अ' आणि ऑस्ट्रेलिया 'अ' यांच्यातील अनऑफिशियल वनडे सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. भारतीय 'अ' संघाचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरसह सलामीवीर प्रियांश आर्य याच्या भात्यातून शतकी खेळी आली. या दोघांशिवाय प्रभसिमरन यानेही अर्धशतक झळकावले. IPL मध्ये प्रितीच्या पंजाबच्या ताफ्यातून हवा करणाऱ्या तिघांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर भारत 'अ' संघाने निर्धारित ५० षटकात ६ बाद ४१३ धावा करत ऑस्ट्रेलियासमोर डोंगराऐवढी धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा
ऑस्ट्रेलिया 'अ' संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग जोडीनं भारत 'अ'संघाच्या डावाची सुरुवात केली. आयपीएलमध्ये प्रिती झिंटाच्या मालकिच्या पंजाबच्या ताफ्यातून हवा करणाऱ्या या जोडीनं टीम इंडियाकडून एकत्र खेळताना पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी रचली. प्रभसिमरन सिंग ५३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ५६ धावांवर माघारी फिरला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यरनंही धमाकेदार खेळीचा नजराणा पेश केला. ७५ चेंडूत शतक साजरे करत त्याने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे.
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
सलामीवीर प्रियांश आर्य अन् श्रेयस अय्यरचं शतक
प्रभसिमरनच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करणाऱ्या प्रियांश आर्यनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात ११ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने १०१ धावा केल्या. श्रेयस अय्यरनं ८३ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ११० धावांची खेळी केली. याशिवाय रियान पराग ६७ (४२) आणि आयुष बडोनी ५० (२७ यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारत 'अ' संघाने निर्धारित ५० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात ४१३ धावा केल्या.
Web Summary : Shreyas Iyer and Priyansh Arya's centuries powered India A to 413 against Australia A. Prabhsimran Singh, Riyan Parag, and Ayush Badoni also contributed with solid scores.
Web Summary : श्रेयस अय्यर और प्रियांश आर्य के शतकों की बदौलत इंडिया ए ने ऑस्ट्रेलिया ए के खिलाफ 413 रन बनाए। प्रभसिमरन सिंह, रियान पराग और आयुष बडोनी ने भी ठोस स्कोर का योगदान दिया।