Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी

पहिल्या षटकात ठरली महागडी, दुसऱ्या षटकात दोन विकेट्स घेत जबरदस्त कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 21:18 IST

Open in App

IND W vs SL W 3rd T20I Renuka Singh Thakur Took 4 Wickets Two In One Over In Her Comeback Match भारत-श्रीलंका यांच्यातील तिरुवनंतपुरमच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात रेणुका ठाकूर हिला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दोन सामन्यांत बाकावर बसवल्यावर भारताच्या डावाची सुरुवात करताना तिची चांगलीच धुलाई झाली. पण त्यानंतर तिने दमदार कमबॅक करताना तिने  एका षटकात दोन विकेट्स घेतल्या. एवढ्यावरच न थांबता तिने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात भारतीय संघाकडून सर्वाधिक ४ विकेट्स घेत श्रीलंकचे कंबरडे मोडले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पहिल्या षटकात खर्च केल्या १२ धावा, दुसऱ्या षटकात दोन विकेट्स घेत जबरदस्त कमबॅक

कमबॅकच्या सामन्यात रेणुका ठाकूर हिने पहिल्याच षटकात २ चौकारांसह १२ धावा खर्च केल्या. हसीना परेरानं तिच्या गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी केल्यावर हरमनप्रीत कौरनं पुढच्या षटकात तिच्याऐवजी दीप्तीच्या हाती चेंडू सोपवला. दीप्तीनं पाचव्या षटकात श्रीलंकन कर्णधार अट्टापटूच्या रुपात भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. मग हरमनप्रीत कौरनं पुन्हा एकदा चेंडू रेणुकाच्या हाती सोपवला. सहाव्या षटकात तिने पहिल्या षटकात धुलाई करणाऱ्या हसिनी परेराला (Hasini Perera) दीप्ती करवी झेलबाद केले. याच षटकातील शेवटच्या चेंडूवर तिने हर्षिताला आपल्याच गोलंदाजीवर स्वत: अप्रतिम झेल घेत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पुढच्या दोन षटकात तिने आधी निलाक्षी डि सिल्वा आणि  इमेशा दुलानी यांच्या विकेट्स घेत तिने ४ षटकात २१ धावा खर्च करत ४ विकेट्सचा डाव साधला.  

लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज

रेणुका ठाकूर शिवाय भारतीय संघाकडून दीप्ती शर्मानं ३ विकेट्स घेतल्या.  अन्य गोलंदाजांना विकेट मिळाल्या नसल्या तरी प्रत्येकीनं उत्तम गोलंदाजी केल्यामळे करो वा मरो लढतीत श्रीलंकेचा संघ  निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात फक्त  ११२ धावांपर्यंतत मजल मारू शकला.

English
हिंदी सारांश
Web Title : Renuka Thakur's comeback seals India's win against Sri Lanka Women.

Web Summary : Renuka Thakur's impressive comeback, claiming 4 wickets after an expensive first over, helped India restrict Sri Lanka to a low score. Deepti Sharma supported with 3 wickets, ensuring India's victory in the crucial T20I match.
टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघभारत विरुद्ध श्रीलंकाबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघहरनमप्रीत कौर