IND W vs SL W 1st T20I emimah Rodrigues Fifty India Beat Sri Lanka By Eight Wickets In Vizag : जेमिमा रॉड्रिग्सच्या कडक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात पाहुण्या श्रीलंकेच्या संघाला ८ विकेट्स राखून पराभूत केले आहे. हरमनप्रीत कौरनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारतीय गोलदांजांनी श्रीलंकेच्या संघाला निर्धारित २० षटकात ६ बाद १२१ धावांवर रोखले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जेमिमाची कडक फिफ्टी, टीम इंडियाची मालिकेत १-० अशी आघाडी
श्रीलंकेच्या संघाने दिलेल्या १२२ धावांचा पाठलाग करताना शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. पण दोघीही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतल्या. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्स हिने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पुन्हा एकदा आपल्यातील क्लास दाखवून दिला. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत आश्वासक खेळी करणाऱ्या जेमीनं टी-२० मध्येही सर्वोत्तम कामगिरी करण्यास तयार असल्याची झलक दाखवून दिली. तिने अर्धशतकी खेळीसह भारतीय संघाचा विजय अगदी सहज सोपा केला.
WPL लिलावात अनसोल्ड; पण आता थेट टीम इंडियात एन्ट्री! कोण आहे Vaishnavi Sharma? जाणून घ्या सविस्तर
श्रीलंकेच्या संघाकडून विश्मीका गुणरत्नेची सर्वोत्तम कामगिरी
पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाकडून विश्मीका गुणरत्ने हिने ४३ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार चामरी अट्टापटू १५ (१२), हसीनी परेरा २० (२३), हर्षिता माधवी २१ (२३) वगळता अन्य कोणत्याही बॅटरला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून क्रांती गौड, दीप्ती शर्मा, श्री चरणी यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जम्या केल्या. श्रीलंकेच्या संघाने रन आउटच्या रुपात तीन विकेट्स गमावल्याचे पाहायला मिळाले.
जेमिचा धमाका, कर्णधार हरमनप्रीतन दिली उत्तम साथ
श्रीलंकेच्या संघाने दिलेल्या धावंचा पाठलाग करताना अवघ्या १३ धावांवर शफाली वर्माने आपली विकेट गमावली. तिने ५ चेंडूत ९ धावा केल्या. तिची जागा घेण्यासाठी आलेल्या जेमिमा रॉड्रिग्जनं स्मृतीच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी ४१ चेंडूत ५४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. स्मृती मानधना हिने २५ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. संघाच्या धावफलकावर ६७ धावा असताना स्मृती मानधनाच्या खेळीला ब्रेक लागला. त्यानंतर जेमीनं कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी ३९ चेंडूत नाबाद ५५ धावांची भागादीर रचत १५ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मॅच संपवली. जेमीनं ४४ चेंडूत १० चौकाराच्या मदतीने ६९ धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या बाजूला हरमनप्रीत कौर १६ चेंडूत १५ धावांवर नाबाद राहिली.
Web Summary : Jemimah Rodrigues's brilliant fifty powered India Women to an eight-wicket victory against Sri Lanka in the first T20I. India leads the series 1-0 after chasing down the target comfortably in Vizag.
Web Summary : जेमिमा रोड्रिग्स के शानदार अर्धशतक की बदौलत भारत की महिला टीम ने पहले टी20 मैच में श्रीलंका को आठ विकेट से हराया। विशाखापत्तनम में भारत ने आसानी से लक्ष्य का पीछा किया।