IND W vs SA W ICC Women's ODI World Cup Live Streaming Where To Watch India : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ आंध्र प्रदेश येथील विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध भिडणार आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील तिसरा सामना जिंकून हॅटट्रिकचा डाव साधत भारतीय संघाला गुणतालिकेत आघाडीच्या चार संघांमध्ये अव्वलस्थानी विराजमान होण्याची संधी असेल. पण ही लढाई पहिल्या दोन संघाविरुद्धच्या लढतीऐवढी सोपी नसेल.
टीम इंडियासाठी यंदाच्या हंगामातील हा पहिला अवघड पेपर असेल. दोन्ही संघातील या सामन्यात स्मृती मानधना आणि तांझिम ब्रिट्स या दोघींमध्ये कोण भारी ठरणार यावरही सर्वांच्या नजरा असतील. इथं एक नजर टाकुयात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील दहावा सामना कुठं अन् कसा पाहता येईल? दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे? यासंदर्भातील सविस्तर माहिती
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कुठं अन् कसा पाहता येईल?
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांतील प्रसारणाचे हक्क स्टार नेटवर्ककडे आहेत. भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील वेगवेगळ्या चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय जिओ हॉस्टार अॅपवर लाइव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून क्रिकेट चाहते या सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
भारत-दक्षिण आफ्रिका हेड टू हेड रेकॉर्ड
- दोन्ही संघातील सामने - ३३
- भारतीय महिला संघ- २० विजय
- दक्षिण आफ्रिका संघ - १२ विजय
- दोन्ही संघातील एक सामना अनिर्णित
भारत महिला संघ
भारतीय महिला संघ: प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, रिचा घोष (विकेट किपर बॅटर), श्री चरणी, क्रांती गौड, रेणुका सिंह ठाकूर, अमनजोत कौर, उमा चेत्री, अरुंधती रेड्डी.
दक्षिण आफ्रिका महिला संघ
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताझमिन ब्रिट्स, सुने लुस, मॅरिझान कॅप, अँनेके बॉश, सिनालो जाफ्ता (विकेटकिपर बॅटर), क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, मसाबाता क्लास, अयाबोंगा खाका, नोनकुलुलेको म्लाबा, तुमी सेखुखुने, नोंडुमिसो शांगसे, कराबो मेसो, ॲनेरी डेर्कसेन.