IND W vs ENG W : लॉर्ड्सच्या मैदानात चित्र पालटलं; दमदार कमबॅकसह टीम इंडिया मालिका जिंकणार?

टी-२० मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय महिला संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही विजयी सलामी दिली. पण लॉर्ड्सच्या मैदानात चित्र पालटले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 11:28 IST2025-07-22T11:19:41+5:302025-07-22T11:28:26+5:30

whatsapp join usJoin us
IND W vs ENG W 3rd ODI India vs England Women Indian Team Eye On Series Win Final Match | IND W vs ENG W : लॉर्ड्सच्या मैदानात चित्र पालटलं; दमदार कमबॅकसह टीम इंडिया मालिका जिंकणार?

IND W vs ENG W : लॉर्ड्सच्या मैदानात चित्र पालटलं; दमदार कमबॅकसह टीम इंडिया मालिका जिंकणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England Women vs India Women, 3rd ODI : इंग्लंडच्या ड्युरॅम काउंटीमधील चेस्टर-ल-स्ट्रीटच्या येथील रिव्हरसाईड मैदानात भारत आणि इंग्लंड महिला संघातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार, सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी हा सामना सुरु होईल.  टी-२० मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय महिला संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही विजयी सलामी दिली. पण लॉर्ड्सच्या मैदानात चित्र पालटले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

लॉर्ड्सच्या मैदानात इंग्लंडच्या संघाने साधली बरोबरी

 पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी २९-२९ षटकांच्या सामन्यात यजमान इंग्लंड महिला संघाने बाजी मारली आणि मालिकेत १-१ बरोबरी साधली. लॉर्ड्सच्या मैदानात ज्या चुका केल्या त्या टाळून टीम इंडिया आता मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. 

मिताली ते स्मृती! जाणून घ्या वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय 'रन'रागिणींचा खास रेकॉर्ड

मालिका विजयाचा सिलसिला कायम ठेवण्याचं चॅलेंज

याआधी भारतीय महिला संघाने २०२२ मध्ये इंग्लंडमध्ये शेवटची वनडे मालिका खेळवण्यात आली होती . झुलन गोस्वामीच्या अखेरच्या मालिकेत भारतीय संघाने घरच्या मैदानात खेळणाऱ्या इंग्लंड महिला संघाला ३-० अशी मात दिली होती. यजमानांनी मालिकेत बरोबरी साधल्यावर भारतीय संघ इंग्लंडमधील मालिका विजयाचा सिलसिला कायम ठेवण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.  

वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टिने मालिका विजय दोन्ही संघासाठी ठरेल महत्त्वपूर्ण

भारत-इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिका दोन महिन्यावर असलेल्या वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टिनेही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ३० सप्टेंबरपासून भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली पाच शहरात वनडे वर्ल्ड कपचे सामने खेळवण्यात येणार आहेत. भारतीय महिला संघाने आतापर्यंत एकदाही वनडे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकलेली नाही. इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकली तर भारतीय संघाला घरच्या मैदानात रंगणाऱअया आगामी आयसीसी स्पर्धेसाठी निश्चितच बळ मिळेल.

स्मृती मानधनासह दीप्तीचा जलवा, पण....

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय महिला संघाची उप कर्णधार स्मृती मानधना आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा या दोघी सोडल्या तर अन्य बॅटर्स सोफी एक्लेस्टोन, एम अर्लट आणि लिंसी स्मिथ यांच्या गोलंदाजीसमोर संघर्ष करताना दिसल्या आहेत. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात साऱ्या जणींनी मिळून तिघींच चॅलेंज परतवून लावलं तर टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग सहज सुकर होऊ शकतो. भारतीय फलंदाजीत प्रतिका रावल, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल आणि कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.

भारतीय महिला संघाची इंग्लंडच्या मैदानातील वनडेतील कामगिरी

  • १९९९ भारतीय संघाने २-१ अशी जिंकली होती मालिका
  • २००२ इंग्लंडच्या संघाने ३-० अशी क्लीन स्वीप मिळाली
  • २००६  पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं ४-१ अशी बाजी मारली
  • २०१२  दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली 
  • २०१४  तीन सामन्यांची मालिका इंग्लंडच्या संघाने ३-१ अशी जिंकली
  • २०१८   तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने  २-१ अशी बाजी मारली
  • २०२२  तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने ३-० अशी क्लीन स्वीप दिली
     

 

Web Title: IND W vs ENG W 3rd ODI India vs England Women Indian Team Eye On Series Win Final Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.