IND W vs AUS W 2nd ODI India Women won by 102 runs Against Australia : स्मृती मानधनाच्या शतकी खेळीनंतर क्रांती गौडनं केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर न्यू चंदीगड येथील महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केलीये. भारतीय महिला संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना स्मृती मानधनाच्या खेळीच्या जोरावर ४९.५ षटकात २९२ धावा करत ऑस्ट्रेलियन संघासमोर २९३ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा यशस्वी बचाव करताना ऑस्ट्रेलियाला १९० धावांत ऑल आउट करत भारतीय संघाने १०२ धावांनी सामना जिंकत ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेतील टीम इंडियाचा हा सर्वात मोठा अन् विक्रमी विजय ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्मृतीची प्रतिकाच्या साथीनं अर्धशतकी भागीदारी, वनडेतील क्वीननं शतकी डावही साधला
ऑस्ट्रेलियन संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर प्रतिका रावल आणि स्मृती मानधना या हिट जोडीनं टीम इंडियाला तगडी सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली. प्रतिका २५ धावांवर बाद झाल्यावर स्मृती मानधना मैदानात तग धरून उभा राहिली.तिने ९१ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ११७ धावांची सर्वोच्च खेळी केली. याशिवाय दीप्ती शर्मानं ५३ चेंडूत ४० धावा केल्या. रिचा घोषनं ३३ चेंडूत २९ तर तळाच्या फलंदाजीत स्नेह राणा हिने १८ चेंडूत २४ धावांची उपयुक्त खेळी करत संघाच्या धावफलकावर २९२ धावा लावल्या होत्या.
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
क्रांती अन् दीप्तीनं मिळून अर्धा संघ तंबूत धाडला
भारतीय संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात क्रांती गौड हिने ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीच्या रुपात ऑस्ट्रेलिया पहिला धक्का दिला. ती ९ धावांवर माघारी फिरली. रेणुकानं सलामीची बॅटर ज़ॉर्जियाला खातेही उघडू दिले नाही. या धक्क्यातून ऑस्ट्रेलिया सावरलीच नाही. परिणामी संघ १९० धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून क्रांती गौड हिने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्मानं २ तर रेणुका, स्नेह राणा, अरुंधती आणि राधा यादव या प्रत्येकी एक एक विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या ODI मधील सर्वात मोठ्या पराभवाच्या नोंदी (धावांनी)
- १०२ धावा – भारत महिला विरुद्ध, मुल्लनपूर, २०२५
- ९२ धावा – इंग्लंड महिला विरुद्ध, एडबॅस्टन, १९७३
- ८८ धावा – भारत महिला विरुद्ध, चेन्नई (एमएसव्ही), २००४
- ८४ धावा – दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध, नॉर्थ सिडनी, २०२४
- ८२ धावा – न्यूझीलंड महिला विरुद्ध, लिंकन, २००८
Web Title: IND W vs AUS W 2nd ODI India Women won by 102 runs Against Australia Womena And Set New Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.