ICC T20 World Cup 2026, India vs Zimbabwe, 48th Match, Super 8 Group 1 : चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात भारतीय संघ दोन बदलासह मैदानात उतरला आहे. भारतीय संघाला २४ वर्षांनी झिम्बाब्वेविरुद्ध 'करो वा मरो' अशा सामन्यात भिडत आहे. या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नाणेफेकीचा कौल बाजूनं लागला नसला तरी सूर्यानं मात्र सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आम्ही पहिल्यांदा फलंदाजीच करणार होतो, हे सांगत झिम्बाब्वेसमोर तगडे आव्हान ठेवण्यासाठी सज्ज असल्याचे त्याने सांगितले. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 'बापू' अर्थात अक्षर पटेलची एन्ट्री झाली आहे. याशिवाय रिंकू सिंहच्या जागी संजू सॅमसनला संघात स्थान मिळाले आहे. IPL मध्ये राजस्थानकडून चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात गेल्यावर टीम इंडियाकडून पहिल्यांदाच संजू चेपॉकच्या मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आपल्या नव्या घरात तो धमाकेदार कामगिरी करणार का? ते पाहण्याजोगे असेल.
सेमीचा मार्ग झाला मोकळा, आता....
सुपर ८ मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या पराभवानंतर भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. पण झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरण्याआधीच टीम इंडियाचा नेट रनरेटचं मोठं कोडं सुटलं. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वेस्ट इंडिजला पराभूत केल्यावर आता टीम इंडियाला झिम्बाब्वेसह वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना जिंकत स्वबळावर सेमी फायनलचं तिकीट बूक करता येईल.
भारताची प्लेइंग इलेव्हन
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
झिम्बाब्वे प्लेइंग इलेव्हन :
तादिवानाशे मारुमनी (यष्टीरक्षक), ब्रायन बेनेट, डायन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रझा (कर्णधार), टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, टिनोटेंडा मापोसा, ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड नगारावा.