IND vs ZIM 3rd ODI Live : आवेश खानला षटकार खेचणे पडले महागात; झिम्बाब्वेचा ओपनर मैदानावर लागला लोळू... 

India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : भारताच्या २९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने धावांचा वेग चांगला ठेवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 06:17 PM2022-08-22T18:17:24+5:302022-08-22T18:17:42+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ZIM 3rd ODI Live : Takudzwanashe Kaitano has retired hurt for 12, was down on the floor and is now walking back | IND vs ZIM 3rd ODI Live : आवेश खानला षटकार खेचणे पडले महागात; झिम्बाब्वेचा ओपनर मैदानावर लागला लोळू... 

IND vs ZIM 3rd ODI Live : आवेश खानला षटकार खेचणे पडले महागात; झिम्बाब्वेचा ओपनर मैदानावर लागला लोळू... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : भारताच्या २९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने धावांचा वेग चांगला ठेवला आहे. त्यांनी १५ षटकांत १ बाद ७१ धावा केल्या आहेत, परंतु नशिबाने त्यांनी थट्टा मांडली आहे. शुबमन गिलच्या दमदार १३० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने यजमान झिम्बाब्वेसमोर २९० धावांचे लक्ष्य ठेवले. झिम्बाब्वेत शतक झळकावणारा तो भारताचा सर्वात युवा फलंदाज ठरला, शिवाय त्याची खेळी ही भारतीय फलंदाजांमध्ये झिम्बाब्वेविरुद्धची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली.  

लोकेश राहुल ( ३०) व शिखर धवन (  ४०) यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर शुबमन गिल व इशान किशन यांनी १२७ चेंडूंत १४० धावा जोडताना भारताला मजबूत धावसंख्या उभी करून दिली. इशान ५० धावांवर रन आऊट झाला. झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसन ( १५) लगेच माघारी परतला. शुबमन ९७ चेंडूंत १५ चौकार व १ षटकार खेचून १३० धावांवर माघारी परतला. झिम्बाब्वेविरुद्ध ही भारतीयाची सर्वोत्तम खेळी ठरली आणि त्याने तेंडुलकरचा १९९८सालचा १२७* धावांचा विक्रम मोडला.

प्रत्युत्तरात ताकुझवानाशे कैटानो व इनोसेंट काईया ही जोडी सलामीला आली. कैटानो स्ट्राईकवर होता अन् विश्रांतीनंतर परतलेला दीपक चहर गोलंदाजीला आला. तो पहिला चेंडू टाकण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडपर्यंत पोहोचेपर्यंत काईयाने क्रिज सोडले होते. दीपक थांबला अन् मंकडिंग करून काईयाला रन आऊट केले. पण, त्याने अपील केले नाही आणि काईयाला जीवदान मिळाले. त्याचा फार फायदा झाला नाही आणि तिसऱ्या षटकात चहरने त्याला LBW कडून झिम्बाब्वेला ७ धावांवर पहिला धक्का दिला.  

आवेश खानने टाकलेल्या ६व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कैटानोने शॉर्ट बॉलवर पूल शॉट मारून षटकार मिळवला, परंतु त्याच्या मांडीचे स्नायू ताणले केले आणि वेदनेने जमिनिवर लोळू लागला. १२ धावांवर खेळणाऱ्या कैटानोने रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला.  

Web Title: IND vs ZIM 3rd ODI Live : Takudzwanashe Kaitano has retired hurt for 12, was down on the floor and is now walking back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.