IND vs WI Suryakumar Yadav Takes Roston Chase Stunning Catch : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील अखेरचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यावर वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्माकडून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. सोशल मीडियावर संघाच्या खराब क्षेत्ररक्षणाचा मुद्दा चर्चेत येत असताना भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने चित्त्यासारखी चपळाई दाखवत अप्रतिम झेल घेतला आणि सर्वांना थक्क केले. त्याने रोस्टन चेजचा हवेत झेपावत अविश्वसनीय झेल टिपत क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम नजराणा पेश केला.
सूर्यकुमार यादवनं घेतला डोळ्याचं पारण फेडणारा झेल
वेस्ट इंडिजच्या संघाने संयमी सुरुवात करताना पॉवरप्लेमध्ये एकही विकेट गमावली नव्हती. वरुण चक्रवर्तीनं कर्णधार शई होपच्या रुपात संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने एकाच षटकात कॅरेबियन संघाला धक्क्यावर धक्के दिले. १२व्या षटकात सूर्यानं चेंडू बुमराहकडे सोपवला. बुमराहने तिसऱ्या चेंडूवर धोकादायक वाटणाऱ्या शिमरॉन हेटमायरला बाद केले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर रोस्टन चेसला मिड-ऑनच्या दिशेने फटका मारताना सूर्यानं हवेत झेप घेत अप्रतिम झेल टिपला. चेस २५ चेंडूंमध्ये ४० धावा करून बाद झाला. बुमराहच्या त्या एका षटकाने विंडीजच्या धावगतीवर ब्रेक लागला. सूर्याचा झेल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
IND VS WI : आधी वरुण चक्रवर्तीनं रनआउटची संधी गमावली, त्यात अभिषेक शर्मानं सोपा झेल सोडला अन्...
रोस्टनचा झेल सोडणाऱ्या अभिषेक शर्माला दिला धडा
वेस्ट इंडिजच्या डावातील पाचव्या षटकातच जसप्रीत बुमराहला मोठा फटका मारताना रोस्टन चेज जाळ्यात फसला होता. पण अभिषेक शर्मानं सूर्याच्या पुढ्यात एक सोपा झेल सोडला. त्यावेळी तो १९ धावांवर खेळत होता. एक संधी मिळाल्यावर त्याने २५ चेंडूत ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सूर्यानं घेतलेला झेल अभिषेक शर्मासाठी फिल्डिंग कशी करायची याचा धडा देणारी होती. कॅप्टनच्या कॅचकडे तोही आवाक् होऊन बघत राहिल्याचे पाहायला मिळाले.
Web Summary : Suryakumar Yadav's incredible catch dismissed Roston Chase, shifting momentum in India's favor against West Indies. Despite earlier fielding lapses, Yadav's athleticism proved decisive, showcasing exemplary fielding and leaving everyone in awe. His catch was a lesson for dropped-catch culprit Abhishek Sharma.
Web Summary : सूर्यकुमार यादव के शानदार कैच ने वेस्ट इंडीज के खिलाफ भारत के पक्ष में गति बदल दी। पहले खराब फील्डिंग के बावजूद, यादव की एथलेटिक्स निर्णायक साबित हुई, जिसने अनुकरणीय क्षेत्ररक्षण का प्रदर्शन किया। उनका कैच अभिषेक शर्मा के लिए एक सबक था।