IND vs WI Ravindra Jadeja Now Has Joint 2nd Most POTM Award For India In Test : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा खेळ खल्लास केला. भारतीय संघाने १४१ धावासहा एका डावाने मोठा विजय नोंदवत वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात नंबर वन ऑलराउंडर रवींद्र जडेजानं बॅटिंग-बॉलिंग दोन्हींमध्ये छाप सोडत खास विक्रमाला गवसणी घातलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी
शतकी खेळीसह चार विकेट्सचा डाव साधणाऱ्या जड्डूला पहिल्या कसोटीत सामनावीर पुरस्कार मिळाला. टेस्टमधील आणखी एका बेस्ट कामगिरीसह पोडियमवर जाताच जड्डूच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली. कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत त्याने राहुल द्रविडची बरोबरी केलीये. द्रविडनं आपल्या मोठ्या कसोटी कारकिर्दीत ११ वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला होता. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत उप कर्णधार मिरवणाऱ्या जड्डूनं ११ व्या वेळी सामनावी पुस्कार पटकावला असून आता त्याला सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड खुणावतोय.
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड धोक्यात!
कसोटीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक २०० सामने खेळण्याचा रेकॉर्डही आपल्या नावे नोंदवला आहे. या कारकिर्दीत सचिनने १४ वेळा सामनावीर पुरस्कार पटकवला आहे. सचिनचा हा महारेकॉर्ड माडित काढत द्रविडला इथंही नंबर वन होण्याची संधी आहे.
बॅटिंगनंतर जड्डूची बॉलिंगमध्येही कमाल
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना जड्डूनं १७६ चेंडूत १०४ धावांची नाबाद खेळी केली होती. त्याच्याशिवाय केएल राहुल १०० (१९७) आणि ध्रुव जुरेल १२५ (१२५) यांच्या शतकासह शुबमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने ४४८ धावांवर पहिला डाव घोषित केला. २८७ धावांची आघाडी टीम इंडियाला विजय मिळवून देण्यास पुरेसी ठरली. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ १४६ धावांत आटोपला. जडेजानं ४ विकेट्स घेत गोलंदाजीत जलवा दाखवला.
कसोटीतील कामगिरी
रवींद्र जडेजानं आपल्या आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत ८६ सामन्यातील १६१ डावात ३३४ विकेट्स घेतल्या आहेत. यात १५ वेळा ५ विकट्स आणि ३ वेळा १० विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने नोंदवली आहे. फलंदाजीत १२९ डावात २७ अर्धशतके आणि ६ शतकांसह त्याच्या खात्यात ३९९० धावांची नोंद आहे.