Join us

IND vs WI : 'सूर्या'चा अंदाज चुकला अन् गिल फसला; बाद नसतानाही शुबमननं धरला बाहरेचा रस्ता

IND vs WI 5th T20 Live : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 20:35 IST

Open in App

फ्लोरिडा (अमेरिका) | IND vs WI 5th T20 Live Updates in marathi : वेस्ट इंडिजविरूद्धच्या चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात ७७ धावांची मोठी खेळी केल्यानंतर शुबमन गिलला निर्णायक सामन्यात स्वस्तात माघारी परतावे लागले. आज पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना खेळवला जात आहे. पहिल्याच चेंडूपासून आक्रमक खेळ करण्याच्या इराद्यात असलेल्या यशस्वीला केवळ ५ धावांवर तंबूत परतावे लागले. अकिल होसैनने आपल्या पहिल्या षटकात संघाला एक बळी मिळवून दिला. लक्षणीय बाब म्हणजे अकिल होसैनने आपल्या दुसऱ्या षटकात शुबमन गिलला एलबीडब्ल्यू बाद करून भारताला दुसरा झटका दिला. गिल ९ चेंडूत ९ धावा करून तंबूत परतला.

खरं तर गिलला बाद नसताना देखील बाहेरचा रस्ता धरावा लागला. एलबीडब्ल्यूचा शिकार झालेल्या गिलने नॉन स्ट्रायकरवर असलेल्या सूर्यकुमार यादवची मदत घेतली. पण, सूर्याचा अंदाज चुकल्याने गिल फसला अन् त्याला तंबूत परतावे लागले. गिल ज्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद झाला तो चेंडू missing Stumps होता. त्यामुळे थर्ड अम्पायरची मदत अर्थात रिव्ह्यू घेतला असता तर गिलला जीवदान मिळाले असते. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.

आजच्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ -रोवमॅन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकिल होसैन, अल्झारी जोसेफ.

  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशुभमन गिलसूर्यकुमार अशोक यादवभारतीय क्रिकेट संघ
Open in App