Dhruv Jurel Honors Kargil Hero Father With Special Celebration After Maiden Test Ton : वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात टीम इंडियातील 'ध्रुव तारा' चमकला. पंतच्या दुखापतीमुळे ध्रुव जुरेल ((Dhruv Jurel) याला पहिल्या पसंतीच्या विकेट किपर बॅटरच्या रुपात टीम इंडियात स्थान देण्यात आले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने शतक साजरे करत आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. शतकी खेळीनंतर त्याने खास अन् अनोख्या अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. त्याची खेळीप्रमाणेच सेलिब्रेशनची गोष्टही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. जाणून घेऊयात त्याच्या सेलिब्रेशनमध्ये दडलेल्या खास गोष्टीसंदर्भातील सविस्तर माहिती
शतकी तोफ डागल्यावर ध्रुव जुरेलनं दिला 'बाप-माणसाला' सेल्युट!
ध्रुव जुरेलनं कसोटी कारकिर्दीतील पहिल्या शतकाला गवसणी घातल्यावर जवान किंवा पोलिस ज्या पद्धतीने बंदुकीनं सलामी देतात त्याप्रमाणे बॅटनं सलामी देत शतकाचा आनंद साजरा केला. ध्रुव जुरेल याचे वडील नेम चंद हे भारतीय सैन्यातील सेवानिवृत्त हवालदार आहेत. कारगिल युद्धात ते देशासाठी लढलेही आहेत. आपले पहिले शतक वडिलांना समर्पित करण्याच्या भावनेतून त्याने बॅटची बंदूक करत वडिलांना सेल्युट केला.
जड्डूसोबत द्विशतकी भागीदारी
भारतीय संघाच्या पहिल्या डावात ५७ व्या षटकात धावफलकावर १८८ धावा असताना शुबमन गिलच्या संघाला तिसरा धक्का बसला. ध्रुव जुरेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. आधी त्याने केएल राहुलसोबत ३० धावांची भागीदारी केली. मग ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा जोडी जमली. दोघांनी सहाव्या विकेसाठी द्विसथकी शतकी भागीदारी रचत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. १९० व्या चेंडूवर र खणखणीत चौकार मात त्याने शतक साजरे केले. १५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने त्याने पहिल्या डावात २१० चेंडूत १२५ धावांची खेळी साकारली.