IND vs USA T20 World Cup Jasprit Bumrah Out Due To Fever : मुंबईतील वानखेडेच्या मैदानातून गत चॅम्पियन भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या आपल्या माहिमेला सुरुवात करत आहे. पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवनं नाणेफेकीचा कौल गमावला. इथं अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेल याने बाजी मारत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सराव सामन्यात पाहायला मिळालेला सलामीचा प्रयोगच या सामन्यातही पाहायला मिळणार असल्याचे टॉसनंतर सूर्यकुमार यादवनं स्पष्ट केले. याशिवाय जसप्रीत बुमराहशिवाय संघ मैदानात उतरणार असल्याची माहिती देताना त्याने वाइल्ड कार्ड एन्ट्री मारणाऱ्या मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्याचे त्याने दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जसप्रीत बुमराहशिवाय मैदानात उतरली टीम इंडिया, कारण...
टॉस दरम्यानं सूर्यकुमार यादवनं संघात कोण आहे हे सांगताना सर्वात आधी बाकावर कोणाला बसवले, त्यांची नावे सांगितली. संजू सॅमसनसह जसप्रीत बुमराह या सामन्यासाठी उपलब्ध नाही अशी माहिती सूर्यानं दिली. तब्येत ठिक नसल्यामुळे बुमराह खेळत नाही, असेही त्याने स्पष्ट केले. त्याच्या अनुपस्थितीत हर्षित राणाच्या दुखापतीमुळे टी-२० वर्ल्ड कप संघात 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री मिळालेल्या मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
T20 World Cup 2026: रोमारियो शेफर्डची कमाल! पहिल्याच सामन्यात हॅटट्रिकसह खास विक्रमाला गवसणी अन्...
भारत प्लेइंग इलेव्हन :
ईशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती. अमेरिका प्लेइंग इलेव्हन : अँड्रिज गॉस (यष्टीरक्षक), सैतेजा मुक्कामल्ला, मोनांक पटेल (कर्णधार), मिलिंद कुमार, संजय कृष्णमूर्ती, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसीन, शेडली व्हॅन शाल्कविक, अली खान, सौरभ नेत्रावलकर.
Web Summary : India faces USA in T20 World Cup. Bumrah misses due to illness; Siraj replaces him. Samson is also out. India's playing eleven announced.
Web Summary : भारत टी20 विश्व कप में यूएसए से मुकाबला करेगा। बुमराह बीमारी के कारण बाहर; सिराज ने उनकी जगह ली। संजू भी बाहर हैं। भारत की प्लेइंग इलेवन घोषित।