Join us

Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

आधी स्लो चेंडू टाकले अन् एकदम वेग पकडत सुरेख यॉर्कर चेंडूवर घेतली विकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 23:38 IST

Open in App

India vs UAE Asia Cup 2025 : आशिया चषक स्पर्धेतील आपल्या सलामीच्या लढतीत टीम इंडियाने अपेक्षेप्रमाणे यूएईच्या संघाला एकहाती पराभूत केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना यूएईचा संघ अवघ्या ५७ धावांत आटोपला. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने पॉवरप्लेमध्येच सामना जिंकला. त्याआधी टीम इंडियाच्या गोलंदाजी वेळी पॉवर प्लेमध्ये बुमराहसंदर्भात एक खास गोष्ट पाहायला मिळाली. जे मागील ६ वर्षांपासून घडलं नाही ते काम सूर्यकुमार यादवनं यावेळी जसप्रीत बुमराहकडून करून घेतलं. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आधी स्लो चेंडू टाकले अन् एकदम वेग पकडत सुरेख यॉर्कर चेंडूवर घेतली विकेट

यूएई विरुद्ध जसप्रीत बुमराह प्रमुख गोलंदाज असताना सूर्यकुमार यादवनं हार्दिक पांड्याच्या हाती चेंडू सोपवत खेळाची सुरुवात केली. दुसऱ्या षटकात बुमराह गोलंदाजीला आला. या षटकात UAE चा सलामीवर अलीशान शराफूनं त्याला एक चौकारही मारली. पण त्यानंतर वैयक्तिक दुसऱ्या षटकात हळूवार चेंडूचा मारा करत बुमराहनं १४० kph वेगाने सुंदर यॉर्कर चेंडूवर अलीशान शराफूला तंबूचा रस्ता दाखवला. 

रुमाल पडला; बॅटर क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं ठरवलं Not Out

अन् पुन्हा जुळून आला ९ वर्षांपूर्वीचा तो कमालीचा योगायोग 

पहिली विकेट मिळवल्यावर तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराह पुन्हा गोलंदाजीला आला अन्  मागील ६ वर्षांत जे पाहायला मिळालं नाही ते चित्र दिसलं. याआधी २०१९ मध्ये विशाखापट्टणमच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० सामन्यात जसप्रीत बुमराहनं पॉवरप्लेमध्ये आपल्या कोट्यातील ३ षटके टाकली होती. या आकडेवारीतील आणखी एक रंजक गोष्ट ही की, पहिल्यांदा गोलंदाजी करताना ९ वर्षांनी हे घडलंय. याआधी २०१६ च्या टी-२० आशिया कप स्पर्धेत यूएईच्या संघाविरुद्धच पहिल्यांदा गोलंदाजी करताना बुमराहनं पॉवरप्लेमध्ये ३ षटके फेकली होती. यंदाच्या आशिया कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत बुमराहनं स्लो सुरुवात करुन गती पकडत एक महत्त्वपूर्ण विकेट घेताना ३ षटकात १७ धावा खर्च केल्या.

टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपजसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघसंयुक्त अरब अमिराती